12 November 2019

News Flash

रिचा चड्ढाला करावा लागला होता कास्टिंग काऊचचा सामना

रिचाने एका मुलाखतीमध्ये हा खुलासा केला आहे

संग्रहित छायाचित्र

दमदार अभिनय आणि स्पष्ट वक्तव्यामुळे ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे रिचा चड्ढा. गेल्या वर्षी सुरु झालेल्या #MeToo मोहिमेला पाठिंबादेत रिचाने होणाऱ्या अन्याया विरोधात आवाज उठवला होता. मात्र याच रिचाला अभिनेत्री झाल्यानंतरही कास्टिंग काऊचचा सामना करावा लागल्याचे तिने एका मुलाखतीमध्ये सांगितले आहे. या मुलाखतीमध्ये खुद्द रिचाने हा किस्सा सांगितला आहे.

रिचाने नुकताच पिंकविला या वेबसाईटला एक मुलाखत दिली आहे. मुलाखतीदरम्यान तिला कास्टिंग काऊच बद्दल विचारण्यात आले होते. त्यावर रिचाने तिझ्यासोबत घडलेला एक किस्सा सांगितला आहे. ‘मला लोकांचे इशारे आणि त्यामागील हेतू कधी समजले नाही. एक दिवस एक व्यक्ती माझ्या जवळ आला आणि म्हणाला आपण एकत्र जेवायला जायला पाहिजे. तेव्हा मी मनात कोणताही विचार न आणता माझे जेवण झाले आहे असे उत्तर दिले. त्यावेळी त्या व्यक्तीचा उद्देश मला कळालाच नाही’ असे रिचा म्हणाली.

आणखी वाचा : ही लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री आता झाली पॉर्न स्टार

दरम्यान रिचाने तिला ऑफर केलेल्या रोलबद्दल ही वक्तव्य केले. ‘एकदा हृतिक रोशची आई या भूमिकेची ऑफर मला देण्यात आली होती. त्यावर संतापून मी चित्रपट दिग्दर्शकाला फोन केला आणि योग्य भूमिकेची मागणी केली होती. मात्र त्या दिग्दर्शकाने मला आत्तापर्यंत प्रत्युत्तर दिलेले नाही’ असे रिचा म्हणाली.

First Published on October 15, 2019 1:09 pm

Web Title: richa chadda experience casting couch avb 95