29 September 2020

News Flash

#MeToo : रिचा चड्ढाचा कोरिओग्राफरसोबतचा ‘तो’ अनुभव थक्क करणारा

नृत्यदिग्दर्शकाने माझ्याकडे विचित्र मागणी केल्याचं रिचाने म्हटलं आहे.

रिचा चढ्ढा

काही दिवसापूर्वी कलाविश्वात निर्माण झालेलं #MeToo मोहिमेचं वादळ आता काही अंशी शमलं आहे. या मोहिमेमध्ये अनेक महिलांनी त्यांच्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडली होती. मात्र आता पुन्हा एकदा या मुद्द्यावर अभिनेत्रींनी आवाज उठवायला सुरुवात केल्याचं पाहायला मिळत आहे. नुकताच अभिनेत्री रिचा चड्ढाने तिचा #MeToo अनुभव शेअर केला आहे.

एका चित्रपटासाठी गाण्याचं चित्रीकरण सुरु असताना नृत्यदिग्दर्शकाने माझ्याकडे विचित्र मागणी केल्याचं रिचाने शेअर केलेल्या अनुभवात म्हटलं आहे. गाण्यासाठी कोरिओग्राफर आम्हाला डान्स शिकवत होते. त्यावेळी माझी बेंबी नीट दिसत नसल्यामुळे मला कोरिओग्राफरने जीन्स कमरेखालती करण्यास सांगितल्याचं रिचाने म्हटलं आहे.

 

View this post on Instagram

 

@therichachadha on the sets of #Shakeela biopic, written n directed by #indrajitlankesh. #richachadda

A post shared by GOLDEN ZEBRA (@_golden_zebra) on

‘गाण्याचा सराव सुरु असताना मी हाय वेस्ट जीन्स घातली होती. त्यामुळे माझी बेंबी दिसत नव्हती. हे पाहून कोरिओग्राफरने मला जीन्स कमरे खालती घेण्याचा सल्ला दिला. कोरिओग्राफरचा हा सल्ला ऐकून मी काही क्षण भांबावून गेले होते. मात्र पुढच्या क्षणाला मी असं काही एक करणार नाही असं ठणकावून सांगितलं’, असं रिचाने सांगितलं.

पुढे ती असंही म्हणाली, ‘जर बेंबी पाहण्यासाठी तुम्ही असं करत असाल तर मी चेहऱ्यावर किंवा कपाळावर मार्करच्या सहाय्याने चिन्ह काढते त्यालाच तुम्ही बेंबी समजा असं मी दटावून सांगितलं’.दरम्यान, ‘हा प्रकार सोडला तर मला कलाविश्वात कोणताही वाईट अनुभव आला नाही’, असंही तिने सांगितलं. रिचा सध्या ‘शकीला’ या आगामी चित्रपटात व्यस्त आहे. या चित्रपटाची दिग्दर्शन इंद्रजीत लंकेश करत असून काही दिवसापूर्वीच चित्रपटाचा लोगो प्रदर्शित करण्यात आला आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 20, 2018 11:53 am

Web Title: richa chadda on metoo i was asked to show navel during movie shooting
Next Stories
1 Video : दीपिका -रणवीरचा ‘तो’ व्हिडिओ पुन्हा व्हायरल
2 PHOTO: सुबोधने शेअर केला घाणेकरांच्या भूमिकासाठीच्या लूक टेस्टचा फोटो
3 Video : ‘राम जन्मभूमी’चा ट्रेलर प्रदर्शित, डिसेंबरमध्ये येणार प्रेक्षकांच्या भेटीला
Just Now!
X