स्त्रीमुक्ती आंदोलनाने स्त्रियांना अनेक अधिकार आणि हक्क मिळायला मदत झाली. तिला माणूस म्हणून ओळख मिळण्यास काही अंशी यश मिळाले. तसेच समाजरचनेतही थोडे अनुकूल बदल झाले, पण स्त्रीच्या मूळ पारंपरिक भूमिकेत मात्र फारसा बदल झाला नाही. स्त्री ही वस्तू म्हणून ती संपत्ती असा भाव समाजात कायम राहिला. त्यामुळे तिला सामाजिक, राजकीय, धार्मिक, आणि माणूस म्हणून प्रतिष्ठा कशी मिळेल हा महत्त्वाचा प्रश्न समाजापुढे आणि कायद्यापुढे आजही आहे. त्यामुळे स्त्रिया भारतात सुरक्षित नाहीत असे अभिनेत्री रिचा चड्ढा हिला वाटते.
‘सेक्शन ३७५’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटात रिचा चड्ढा मुख्य व्यक्तिरेखा साकारत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने घेतल्या गेलेल्या एका मुलाखतीत रिचाने भारतातील स्त्रियांचा सुरक्षिततेवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

“महिलांवर होणाऱ्या अत्याचाविरोधात आवाज उठवणाऱ्यांना रोखण्यात कसली आहे देश भक्ती. भारत देश हा केवळ पुरुषांसाठीच सुरक्षित आहे. या देशात स्त्रियांची सुरक्षा केवळ कागदोपत्रीच आहे. या देशात एकीकडे स्त्रियांची पूजा केली जाते तर दुसरीकडे गर्भाशयातच त्यांचा जीव घेतला जातो. स्त्री अत्याचारात भारत अग्रेसर आहे.” अशा शब्दात रिचाने स्री सुरक्षिततेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. दरम्यान या मतांशी सहमत नसलेल्यांनी तिच्यावर जोरदार टीका देखील केली आहे.