News Flash

अली फजल आणि रिचा चड्ढा नव्या भूमिकेत एकत्र…

आपल्या निर्मिती संस्थेच्या माध्यमातून साकारणार एक नवा प्रोजेक्ट

‘फुकरे’ चित्रपटातून एकत्र दिसलेली जोडी म्हणजे अभिनेत्री रिचा चड्ढा आणि अभिनेता अली फजल. हे दोघेही आता प्रेक्षकांना निर्मात्याच्या भूमिकेत दिसणार आहेत. त्यांनी सुरु केलेल्या पुशिंग बटन्स स्टुडिओजच्या बॅनरखाली ते एका चित्रपटाची निर्मिती करणार आहेत.

या दोघांचा निर्माता म्हणून हा पहिलाच चित्रपट असणार आहे. ‘गर्ल्स विल बी गर्ल्स’ या चित्रपटाची निर्मिती हे दोघे करत आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन शुची तलाटी यांचं असणार आहे. या चित्रपटाद्वारे ती दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करत आहे. हिमालयातल्या एका छोट्याशा खेड्यातल्या, शाळेत शिकणाऱ्या एका 16 वर्षांच्या मुलीची आणि तिच्या आईची ही गोष्ट आहे. ही मुलगी दिसायला सुंदर, आकर्षक आहे, बंडखोर वृत्तीची आहे आणि ती वयात येत आहे. तिची आईही तिच्यासोबत आहे. या दोघींचा प्रवास, त्यांच्यातलं नातं सांगणारी कथा आहे.

विशेष म्हणजे ‘गर्ल्स विल बी गर्ल्स’ या चित्रपटाची संहिता ही एकमेव अशी संहिता आहे की जी बर्लिनेल स्क्रिप्ट स्टेशन 2021 कडून मागवण्यात आली आहे. ही एक अशी लॅब आहे की जी जगभरातून फक्त १० संहितांची निवड करते. त्याचबरोबर हा एकमेव भारतीय चित्रपट असेल जो जेरुसलेम चित्रपट महोत्सवात सादर होईल, असं निर्मात्यांचं म्हणणं आहे.

रिचा आणि शुची यांनी यापूर्वी एकत्र काम केलेलं आहे. त्यांनी शिक्षण सुरु असताना एका डॉक्युमेंट्रीचं दिग्दर्शन केलं होतं. संजय गुलाटी आणि क्लेअर कॅसेन हे या चित्रपटाचे सहनिर्माते असतील.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 4, 2021 4:40 pm

Web Title: richa chaddha and ali fazal working together in new role vsk 98
Next Stories
1 ‘१४ वर्षांची असताना माझ्यावर बलात्कार झाला होता’, सलमानच्या एक्स गर्लफ्रेंडचा खुलासा
2 ‘सायना’चा टीझर रिलीज, चाहत्यांची उत्सुकता ताणली
3 ‘फाटकी जीन्स आणि ब्लाउज…’, कंगनाने केलं दीपिकाला ट्रोल
Just Now!
X