News Flash

“तू तर परत गर्भात जा”, रिचा चड्ढा भडकली नेटकऱ्यावर

सडेतोड वक्तव्यांमुळे रिचा कायम चर्चेत असते.

बॉलिवूडमधील सेलिब्रिटींना अनेकदा वेगवेगळ्या कारणांमुळे ट्रोल केलं जातं. यातील काही सेलिब्रिटी ट्रोलर्सकडे दुर्लक्ष करतात. तर काही सेलिब्रिटी मात्र ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर देताना पाहायला मिळतात.

आपल्या सडेतोड वक्तव्यांमुळे चर्चेत असलेली अभिनेत्री रिचा चड्ढा सोशल मीडियावर कायम चर्चेत असते. बिनधास्त मत मांडल्याने आणि वादग्रस्त विधानांमुळे रिचा कायम ट्रोलर्सच्या निशाण्यावर असते. तसंच अनेकदा ती स्त्रीवादी भूमिकेमुळे चर्चेत राहते. नुकताच ट्विटरवर एका युजरने रिचाला एक सवाल करत तिला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. मात्र रिचाने या युजरला तिखट शब्दात फटकारलं आहे. रिचाच्या उत्तरामुळे ती पुन्हा चर्चेत आलीय.

ट्विटरवर एका युजरने रिचाला टॅग करत एक प्रश्न उपस्थित केला होता. “महिलांना आरक्षणाची गरज काय? महिला स्वत:ला पुरुषांपेक्षा कमी समजतात का? कृपा करुन स्वत:च्या बळावर सगळं मिळवा” असा सवाल नेटकऱ्याने करताच रिचाने लगेचच या नेटकऱ्याला सडेतोड उत्तर दिलंय. “तू तर लगेचच परत गर्भात जावं.” असं म्हणत तीने नेटकऱ्याला फटकारलं.
ट्रोलर्सना सडेतोड उत्तर देण्याची रिचाची ही काही पहिली वेळ नाही. याआधी देखील तिने ट्रोल करणाऱ्यांना धारेवर धरलं आहे.रिचा चड्ढा येत्या काळात अनेक सिनेमांमधुन वेगवेगळ्या भूमिकेतून झळकणार आहे. मॅडम चीफ मिनिस्टर,शकीला आणि लाहोर कॉन्फिडेंशल या सिनेमांमधून ती प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 10, 2021 1:07 pm

Web Title: richa chaddha slams to troller who asked her about women reservation kpw 89
Next Stories
1 अमिताभ बच्चन यांच्या नातीने दिल्या बॉयफ्रेंडला वाढदिवसाच्या शुभेच्छा?
2 अशी असते अमृताच्या दिवसाची सुरूवात, योगासोबत योग्य सकाळ
3 ‘हे मन बावरे’मधील अभिनेत्याने केले दुसऱ्यांदा लग्न
Just Now!
X