News Flash

“दोन वर्षे ऑक्सिजनविना बालके मरत होतीच, मग आता का आश्चर्य वाटतंय?”- रिचा चड्ढाचा सवाल!

नाशिक ऑक्सिजन गळती प्रकरणावर केलं ट्विट

राज्यात एकीकडे ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे तर आज एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नाशिकमध्ये ऑक्सिजन गळती झाल्याने २२ रुग्णांना जीव गमवावा लागला आहे. या प्रकरणावर अभिनेत्री रिचा चड्ढाने एक ट्विट केलं आहे. तिने गेल्या २ वर्षांमधले दाखलेही दिले आहेत.

आपल्या ट्विटमध्ये रिचा म्हणते, “खरंच हा असा देश आहे जिथे सलग दोन वर्षे बालकं ऑक्सिजनच्या अभावाने मरत आहेत. आणि आज आपल्याला प्रौढ लोक मरण पावले म्हणून आश्चर्य वाटतंय? आपला भूतकाळ विसरुन आत्ताच्या घटनेबद्दल वाईट वाटून घेणाऱ्या लोकांकडून काय अपेक्षित आहे?”

रिचाने यासोबत काही बातम्यांचे स्क्रिनशॉट्सही जोडले आहेत.

तिचं हे ट्विट सध्या व्हायरल होत आहे. नाशिकमधल्या झाकीर हुसेन हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन टाकीतून गळती झाली होती. ऑक्सिजन टँकरमधून टाकीत भरत असताना ही गळती होत होती.

ती रोखण्यासाठी तात्काळ पथक बोलावण्यात आलं. परंतु दरम्यानच्या काळात व्हेंटिलेटरवर असणाऱ्या २३पैकी २२ रुग्णांचा मृत्यू झाला.
रिचाच्या या ट्विटवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. अनेक मीम्स या कमेंट्समध्ये आहेत.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 21, 2021 4:29 pm

Web Title: richa chaddha tweeted on nashik oxygen leak vsk 98
Next Stories
1 “लोक किती खालच्या थराला जातायत….” ; ‘बिग बॉस’ फेम सिद्धार्थ शुक्ला संतापला!
2 ‘द कपिल शर्मा’ शोमधील ‘या’ अभिनेत्रीचा फोटो व्हायरल; अंदमानमध्ये खास व्यक्तीसोबत धमाल
3 ‘तिसरं मूल झालं तर तुरुंगवासाची शिक्षा झाली पाहिजे’, कंगना रणौत
Just Now!
X