09 March 2021

News Flash

करण, रणबीर आणि नीतू कपूर यांना करोना झाल्याचे ट्विट व्हायरल, रिधिमाने दिले स्पष्टीकरण

अफवा पसरवणाऱ्यांना तिने सुनावले आहे.

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय बच्चन आणि आराध्याची करोना चाचणी पॉझिटीव्ह आल्याचे समोर आले. त्यानंतर सोशल मीडियावर अभिनेता रणबीर कपूर, नीतू कपूर आणि दिग्दर्शक करण जोहरला करोना झाल्याच्या अफवा सुरु झाल्या होत्या. अनेक ट्विट सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आता रणबीरची बहीण रिधिमा कपूरने यावर स्पष्टीकरण दिले आहे.

नुकताच नीतू कपूर यांनी त्यांचा ६२ वा वाढदिवस सेलिब्रेट केला. त्यासाठी रिधिमाने एक पार्टी आयोजित केली होती. या पार्टीला अमिताभ बच्चन यांचा नातू आगस्त्य नंदाने देखील हजेरी लावली असल्याचे व्हायरल होत असलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. अमिताभ बच्चन आणि अभिषेकची करोना चाचणी पॉझिटीव्ह आल्यानंतर सोशल मीडियावर आगस्त्यच्या संपर्कात आलेल्या रणबीर कपूर, करण जोहर यांना करोना झाल्याच्या चर्चा सुरु होत्या. तसेच अनेक ट्विटही व्हायरल झाले होते.

 

View this post on Instagram

 

Attention seeking ??? Least verify/ clarify ! We are fit We are good ! Stop spreading rumours ! #lunatics #fakenews

A post shared by Riddhima Kapoor Sahni (RKS) (@riddhimakapoorsahniofficial) on

आता रणबीरची बहीण रिधिमा कपूरने सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या ट्विटवर स्पष्टीकरण दिले आहे. रिधिमाने व्हायरल होत असलेला एक स्क्रिनशॉट शेअर केला आहे. या स्क्रिनशॉटमध्ये रणबीर कपूर, नीतू कपूर आणि करण जोहर यांची करोना चाचणी पॉझिटीव्ह आल्याचे म्हटले आहे. तसेच अमिताभ बच्चन यांचा नातू आगस्त्य नंदाने बर्थडे पार्टीला हजेरी लावली असल्याचे देखील म्हटले आहे.

सगळ्यांचे लक्ष वेधण्यासाठी तुम्ही हे करत आहात का? पण एखादी माहिती शेअर करण्यापूर्वी ती खरी आहे की खोटी हे पहायाला हवे. आम्ही सगळे ठिक आहोत. अशा अफवा पसवरणे बंद करा या आशयाची पोस्ट रिधिमाने केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 13, 2020 1:30 pm

Web Title: riddhima kapoor speaks on rumours of ranbir kapoor karan johar and neetu kapoor testing positive for covid 19 avb 95
Next Stories
1 सिनेसृष्टीला आणखी एक धक्का; वयाच्या ५७ व्या वर्षी अभिनेत्रीचं निधन
2 “यांना खरंच नेता म्हणायचं का?”; दिग्दर्शकाने साधला राजस्थानमधील घडामोडींवर निशाणा
3 करण जोहरने ट्रोलिंगला कंटाळून सोशल मीडियावर बनवले नवे प्रायव्हेट अकाऊंट?
Just Now!
X