News Flash

‘या’ कारणामुळे रिम्मी सेन बॉलिवूडपासून दुरावली!, “सलमान मदत करेल पण…”

एका मुलाखतीत रिम्मीने याचा खुलासा केला आहे.

बॉलिवूड मधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी म्हणजे रिम्मी सेन. रिम्मीने धूम, गोलमाल, गरम मसाला सारख्या अनेक लोकप्रिय चित्रपटांमध्ये काम केले आहे. मात्र, एक दिवस ती चित्रपटसृष्टीपासून अचानक गायब झाली. त्यामागे कारण काय होतं, हे कोणाला ही माहित नाही. मात्र, नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत रिम्मीने खुलासा केला आहे.

या मुलाखतीत ती बिग बॉस, सलमान खान आणि आणखी अनेक गोष्टींबद्दल बोलली आहे. “मला वाटतं नाही की बिग बॉस तुमचे करिअर बनवण्यात तुमची मदत करेल. तुम्हाला अनेक लोक ओळखू लागतील मात्र, ते फक्त काही दिवसांसाठी असतं. पुढचं हंगाम सुरू होताच लोक तुम्हाला विसरून जातील आणि दुसरी व्यक्ती तुमची जागा घेईल. मला फक्त रिअॅलिटी शो, विनोदी कार्यक्रमांसांरखे शो करून थोड्या दिवसांसाठी राहायचं नाही. लोकांच्या लक्षात राहिल अशी भूमिका साकारायची जी दहा वर्षांपेक्षा जास्त काळ लोकांच्या लक्षात राहिलं, असे काम मला करायचे आहे.”

सलमान खानला कामासाठी विचारण्यावर ती म्हणाली, “आता त्यांच्याकडे आधीच खूप ओझं आहे, अजून किती देऊ. असे पण काही लोक असतात, पण मला त्यांना त्रास देण्याची इच्छा नाही. ते खूप चांगले आहेत. ते सगळ्यांना मैत्रितून मदत करतात. मात्र, मला तसं नको आहे. कोणी माझ्यासाठी कोणता दबाव आणावा किंवा माझ्यासाठी मेहनत घ्यावी अशी माझी इच्छा नाही. सलमानने माझ्यसाठी ते ओझे घ्यावे अशी माझी इच्छा नाही.”

रिम्मीचे लाखो चाहते आहे. रिमीचा ‘बुधिया सिंग- बॉर्न टू रन’ हा शेवटचा चित्रपट होता. या चित्रपटाला राष्ट्रीय पुकस्कारही मिळाला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 8, 2021 6:38 pm

Web Title: rimi sen on why she wont ask for work from salman khan dcp 98
Next Stories
1 धक्कादायक: प्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शकाच्या पत्नीने मुलीसह केली आत्महत्या
2 उर्वशी रौतेलाने पहिल्याच तमिळ चित्रपटासाठी घेतले ‘एवढे’ मानधन; आकडा वाचून व्हाल चकीत!
3 ‘लॉकडाउनसाठी तयार’, आमिरच्या मुलीने शेअर केला बॉयफ्रेंडसोबतचा फोटो
Just Now!
X