25 October 2020

News Flash

रिंकू राजगुरुला रॅपर रफ्तारकडून खास गिफ्ट

पाहा व्हिडीओ

हिंदी आणि पंजाबी चित्रपटसृष्टीमधील लोकप्रिय रॅपर रफ्तार आणि कृष्णा सतत चर्चेत असतात. आता त्यांनी काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘हंड्रेड’ या वेब सीरिजमधील मुख्य पात्र नेत्रा पाटील आणि सौम्या शुक्ला यांच्यावर एक रॅप तयार केला आहे. या गाण्याचे नाव ‘चौकन्ना’ असे आहे. तसेच रफ्तार आणि कृष्णा ‘दो खिलाड़ी, प्रॉब्लम भारी’ थोडा वेगळ्या अंदाजात गाताना दिसत आहेत.

‘हंड्रेड’ या सीरिजमध्ये सौम्या हे पात्र अभिनेत्री सारा दत्ताने साकारले आहे तर नेत्रा हे पात्र रिंकू राजगुरुने साकारले आहे. ‘चौकन्ना’ हे गाणे दोन विरुद्ध व्यक्ती सौम्या आणि नेत्रा यांच्या भोवती फिरताना दिसत आहे. गाण्यामध्ये सौम्याची कथा रफ्तार सांगत आहे तर नेत्राची कथा कृष्णा सांगत आहे. तसेच हे गाणे रिंकू राजगुरुच्या वाढदिवसासाठी एक खास गिफ्ट असल्याचे म्हटले जात आहे. रिंकूचा ३ जून रोजी वाढदिवस आहे.

‘या गाण्याची प्ररेणा हंड्रेड या सीरिजमझील जोडी लारा आणि रिंकूमुळे मिळाली आहे. त्या दोघींचेही आयुष्य वेगवेगळे आहे पण तरी देखील त्या दोघी जेव्हा एकत्र येऊन काम करतात तेव्हा सगळं काही सुरळीत होतं. आम्हाला या दोघींवर गाणे गाण्याची संधी मिळाली म्हणून आम्ही चौकन्ना तयार केले. हे गाणे त्या दोघींवर आधारित आहे. सध्याच्या कठिण कळात हे रॅप साँग लोकांनाही काही तरी नवीन करण्याची प्रेरणा देईल’ असे रॅप बद्दल बोलताना रफ्तार म्हणाला आहे.

‘हंड्रेड’ या वेब सीरिजमध्ये लारा दत्ता आणि रिंकू राजगुरु मुख्य भूमिकेत आहेत. अभिनेते अरुण नलावडे, करण वाही यांनीदेखील स्क्रीन शेअर केली आहे. या सीरिजचे दिग्दर्शन रुचि नारायण यांनी केले. तसेच या सीरिजमध्ये रिंकू म्हणजेच नेत्रा इतर मुलींप्रमाणे स्वित्झर्लंडला जाण्याचे स्वप्न पाहते. पण तिच्या आयुष्यात अशी काही घटना घडते की तिचे संपूर्ण आयुष्य बदलून जाते. याच काळात तिची भेट एका महिला पोलीस अधिकाऱ्याशी (लारा दत्ता) होते. नेत्राला तिची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी येणाऱ्या अडचणी सीरिजमध्ये दाखवण्यात आल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 31, 2020 6:54 pm

Web Title: rinku rajguru birthday gift from rapper raftar avb 95
Next Stories
1 अजयमुळे मी आजही अविवाहित आहे, तब्बूचा खुलासा
2 करिश्मासारखी दिसणारी ही मुलगी आहे तरी कोण?
3 सोनू सूद म्हणतोय, “मला सर नका म्हणू त्याऐवजी ‘या’ नावाने हाक मारलेली आवडेल”
Just Now!
X