News Flash

Video : ‘आली ठुमकत नार लचकत’; रिंकू राजगुरूच्या जबरदस्त परफॉर्मन्सची झलक

या परफॉर्मन्ससाठी रिंकूने कशाप्रकारे तयारी केली आहे हेसुद्धा या व्हिडीओत पाहायला मिळत आहे.

रिंकू राजगुरू

‘सैराट’ या चित्रपटातून धमाकेदार पदार्पण करणारी अभिनेत्री रिंकू राजगुरू सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रीय असते. तिच्या फोटो आणि व्हिडीओंना नेटकऱ्यांकडून भरभरून लाइक्स आणि कमेंट्स मिळतात. कलाक्षेत्रातील तिच्या वावराकडे सर्वांचंच लक्ष असतं. आता रिंकू झी टॉकीजच्या कॉमेडी पुरस्कार सोहळ्यात परफॉर्म करताना दिसणार आहे. त्याची झलक तुम्हाला या व्हिडीओत पाहायला मिळणार आहे.

‘झॉ टॉकिज’च्या इन्स्टाग्राम पेजवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. ‘आली ठुमकत नार लचकत’ या गाण्यावर रिंकूच्या जबरदस्त डान्स परफॉर्मन्स झलक पाहायला मिळतेय. त्याचसोबत या डान्ससाठी ती कशाप्रकारे तयारी करतेय, हेसुद्धा यामध्ये दाखवण्यात आलं आहे. २८ जुलै रोजी संध्याकाळी साडेसहा वाजता हा पुरस्कार सोहळा प्रसारित होणार आहे.

‘सैराट’नंतर रिंकूचा ‘कागर’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटाला प्रेक्षक-समीक्षकांकडून संमीश्र प्रतिक्रिया मिळाल्या. आता रिंकूचा ‘मेकअप’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात रिंकू एका ग्रामीण भागातील मुलीची भूमिका साकारणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 26, 2019 10:12 am

Web Title: rinku rajguru dance performance in award show watch video ssv 92
Next Stories
1 ट्विंकल खन्नाने जग्गी वासुदेव यांना हिमासंदर्भातील ट्विटवरुन केलं लक्ष्य
2 ‘इन्स्टाग्राम’ श्रीमंतांच्या यादीत प्रियांकाने विराटलाही टाकलं मागे; एका पोस्टसाठी आकारते इतके रुपये
3 Kargil Vijay Diwas : जाणून घ्या, कारगिल युद्धाचं बॉलिवूड कनेक्शन!
Just Now!
X