05 April 2020

News Flash

‘मेकअप’साठी रिंकूने घेते इतके मानधन?

इतर अभिनेत्रींच्या तुलनेत ही रक्कम जास्त असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत

नागराज मंजुळे यांच्या ‘सैराट’ या चित्रपटातून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचणारी अभिनेत्री म्हणजे रिंकू राजगुरु. या एकाच चित्रपटाने रिंकू उर्फ आर्चीला एक वेगळीच ओळख निर्माण करुन दिली. आता रिंकू ‘मेकअप’ या चित्रपटातून पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तिच्या या चित्रपटाची उत्सुकता चाहत्यांमध्ये शिगेला पोहोचली आहे. आपल्या अभिनय कौशल्याने आणि सौंदर्याने अनेकांना घायाळ करणारी रिंकू एका चित्रपटासाठी किती मानधन घेत असेल? असा प्रश्न अनेकांना पडतो.

रिंकूने तिचा आगामी चित्रपट ‘मेकअप’साठी तब्बल २७ लाख रुपये मानधन घेतले असल्याचे म्हटले जात आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील इतर अभिनेत्रींच्या तुलनेत ही रक्कम जास्त असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. रिंकूची लोकप्रियता पाहता निर्मात्यांनी तिला इतके मानधन दिले असल्याचे म्हटले जाते.

रिंकूचा लवकरच ‘मेकअप’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने रिंकू आणि अभिनेता चिन्मय उदगीरक ही जोडी पहिल्यांदाच एकत्र पडद्यावर पाहायला मिळणार आहे. रिंकू या चित्रपटात दोन वेगवेगळ्या भूमिकांमध्ये पाहायला मिळणार आहे.७ फेब्रुवारी रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

आणखी वाचा : रिंकू राजगुरुचा साखरपूडा झाला?

याव्यतिरिक्त रिंकू अभिनेता ताहिर शब्बीरसोबत ‘100’ या वेब सीरिजमध्ये झळकणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. ताहिरने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीवर रिंकूचा फोटो पोस्ट केला होता. त्याने पोस्ट केलेल्या फोटोंवरुन रिंकू वेब सीरिजमध्ये दिसणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. या सीरिजमध्ये बॉलिवूड अभिनेत्री लारा दत्ता देखील दिसणार आहे. लारा दत्ता आणि रिंकू राजगुरु या वेब सीरिजच्या माध्यमातून डिजिटल प्लॅटफॉर्मवर पदार्पण करणार आहेत. ही वेब सीरिज हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 25, 2020 2:25 pm

Web Title: rinku rajguru fees for makeup movie avb 95
Next Stories
1 “कुछ लोग मुझे गिराने में कई बार गिरे…”
2 JNU प्रकरणातील आरोपींना कधी पकडणार; अनुराग कश्यप संतापला
3 तिकीटबारीवर ‘तान्हाजी’ सुसाट, केला नवा विक्रम
Just Now!
X