News Flash

रिंकू मावशीचा गोड भाचा, चिमुकल्या सोबत व्हिडीओ शेअर

सोशल मीडियावर रिंकूचे भरपूर चाहते

सगळ्यांच्या आवडत्या आर्चीने म्हणजेच रिंकू राजगुरुने मराठी प्रेक्षकांसोबतच संपूर्ण देशातील प्रेक्षकांची मनं जिंकली आहे. ‘सैराट’ आणि ‘मेकओव्हर’ या सिनेमानंतर रिंकूने ‘हंड्रेड’ या हिंदी वेब सीरिजमधून देशवासियांची पसंती मिळवली. त्यानंतर ‘अनपॉज्ड’ या नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या सिनेमातही रिंकू एका महत्वाच्या भूमिकेत झळकली.

रिंकू सोशल मीडियावरही चांगलीच अ‍ॅक्टीव असते. वेगवेगळे फोटो आणि हटके व्हिडीओ ती शेअर करत असते. नुकताच रिंकूने एक गोड व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केलाय. यात तीने एका चिमुकल्या बाळाला उचलून घेतलं आहे. तर हातात असलेल्या दूधाच्या बाटलीने ती या बाळाला दूध पाजताना दिसतेय. ” बालपणाइतकं सुंदर काहीचं नाही” अशा आशयाचं कॅप्शन रिंकूने या व्हिडीओला दिलंय. व्हिडीयोत दिसणारा चिमुकला हा रिंकूचा भाचा असल्याचं तिने म्हंटलं आहे. भाच्यासोबत मावशी वेळ घालवत असल्याचं तिनं पोस्टमध्ये म्हंटलं. रिंकूच्या या पोस्टला अनेकांनी पसंत केलंय.

याआधी देखील रिंकूने कधी चिमणीसोबत तर कधी लाडक्या मांजरींसोबत खेळतानाचे व्हिडीओ शेअर केले आहेत. सोशल मीडियावरील रिंकूच्या प्रत्येक पोस्टवर चाहत्यांच्या लाईकचा वर्षाव पाहायला मिळतोय. लवकरच रिंकू एका बिग बजेट मराठी सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘छूमंतर’ असं या सिनेमाचं नाव असून लंडनमध्ये या सिनेमाचं चित्रिकरण करण्यात आलंय. या सिनेमात रिंकूसोबत प्रार्थना बेहरे, ऋषी सक्सेना, सुव्रत जोशी हे कलाकाल मुख्य भूमिकेत झळकतील.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 1, 2021 2:03 pm

Web Title: rinku rajguru shares video palyimg with nephew kpw 89
Next Stories
1 काय झालं होतं अमिताभ यांना?; जाणून घ्या….
2 आलियाची नवी झेप, स्वत:च्या प्रोडक्शन हाउसची सुरुवात
3 रिया चक्रवर्ती पुन्हा चर्चेत; नवा फोटो होतोय व्हायरल
Just Now!
X