News Flash

जाणून घ्या, रिंकू राजगुरु सध्या करतेय तरी काय?

निशांत हा खलनायकाच्या भूमिकेसाठी प्रसिद्ध असलेले अभिनेते साथ्या प्रकाश यांचा मुलगा आहे.

रिंकू राजगुरु

नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट या चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टीतील आजवरचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढत एक नवा इतिहास रचला. या चित्रपटाने महाराष्ट्रातीलच नाही तर परदेशातील प्रेक्षकांनाही याडं लावलं. ‘सैराट’मुळे रिंकू राजगुरु आणि आकाश ठोसर हे दोन नवे चेहरे चित्रपटसृष्टीला मिळाले. रिंकूला तर चित्रपटातील तिच्या अभिनयाकरिता सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून गेल्या वर्षी राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. दरम्यान, सैराट या चित्रपटाच्या यशानंतर रिंकू राजगुरूचे असंख्य चाहते बनले आहेत. रिंकूची एक झलक पाहाण्यासाठी लोकांची गर्दी जमते. पण, गेल्या काही दिवसांपासून ही अभिनेत्री कुठेच दिसलेली नाही. ती सध्या नक्की करतेय तरी काय? असा प्रश्न तिच्या चाहत्यांना नक्कीच पडला असेल. तर त्याचे उत्तर आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

‘सैराट’ चित्रपटाचा रिमेक कन्नड भाषेतही येणार असल्याची बातमी काही महिन्यांपूर्वीच आली होती. या चित्रपटाचे चित्रीकरण आता पूर्ण झाले आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात रिंकू राजगुरु दिसणार आहे. ‘सैराट’चा कन्नड रिमेक असलेला ‘मनसु मल्लिगे’ हा चित्रपट येत्या ९ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे. दिग्दर्शक एस. नारायण यांनी सदर बातमीस दुजोरा दिला असून या चित्रपटाची निर्मिती रॉकलाइन व्यंकटेश करणार आहे. यासंबंधीचे वृत्त द न्यू इंडियन एक्स्प्रेस या संकेतस्थळाने दिले आहे. दरम्यान, ‘सैराट’च्या दाक्षिणात्य भाषेतील रिमेकचे अधिकार रॉकलाइन व्यंकटेश निर्मिती संस्थेने घेतले असून हिंदी भाषेतील अधिकार करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनने विकत घेतले आहेत. एस नारायण म्हणाले की, रिंकूने चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण केले असून ती सध्या दुसरे कोणतेच काम हाती घेत नाहीये. ती सध्या तिच्या दहावीच्या अभ्यासात व्यस्त आहे. परिक्षेनंतर ती ‘सैराट’ दिग्दर्शकाबरोबर काम करणार आहे.

manasu-mallige

मनसु मल्लिगे या चित्रपटात आकाशने ठोसरने साकारलेली परश्याची भूमिका अभिनेता निशांत साकारत आहे. निशांत हा खलनायकाच्या भूमिकेसाठी प्रसिद्ध असलेले अभिनेते साथ्या प्रकाश यांचा मुलगा आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 3, 2017 11:34 am

Web Title: rinku rajguru will be seen in remake of sairat kannada version manasu mallige
Next Stories
1 सुशांत-रणवीरमध्ये ‘ऑल इज नॉट वेल..’
2 कोण होतीस तू, काय झालीस तू
3 सलमान, करणच्या चित्रपटात अक्षय कुमारची वर्णी
Just Now!
X