21 September 2020

News Flash

सुपरस्टार विजयच्या चाहत्याने केली आत्महत्या; मृत्यूपूर्वी केलं होतं हे ट्विट

बालाच्या मृत्यूमुळे सोशल मीडियावर खळबळ

अभिनेता विजय (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेता विजयच्या एका चाहत्याने आत्महत्या केली आहे. बालामुरुगन असं त्याचं नाव होतं. त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहून आत्महत्या केली. या पोस्टमध्ये त्याने विजयला देखील टॅग केलं होतं. या खळबळजनक बातमीमुळे विजयच्या चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे.

“प्रेमात धोका मिळाल्यामुळे नव्हे तर कौटुंबीक समस्यांमुळे मी त्रस्त आहे. परिणामी या मार्गाचा मी स्विकार करतोय” अशा आशयाचं ट्विट त्याने केलं होतं. या ट्विटमध्ये त्याने अभिनेता विजयला देखील टॅग केलं होतं. आज तकने दिलेल्या वृत्तानुसार बालामुरुगन सिविल इंजिनिअरिंगचा डिप्लोमा करत होता. शिवाय एका कंपनीत नोकरी देखील करत होता. परंतु लॉकडाउनमुळे तो बेरोजगार झाला. परिणामी नैराश्यात जाऊन त्याने हे टोकाचं पाऊल उचललं. दरम्यान पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत.

बालामुरुगन विजयचा खूप मोठा चाहता होता. त्याने आपली शेवटची पोस्ट विजयला टॅग केली होती. परिणामी सोशल मीडियावर खळबळ माजली आहे. विजयच्या चाहत्यांनी सोशल मीडियाद्वारे त्याला श्रद्धांजली वाहिली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 14, 2020 7:25 pm

Web Title: rip bala vijay fan bala dies by suicide in tamil nadu mppg 94
Next Stories
1 दिशा सालियन मृत्यू प्रकरण: अभिनेत्याच्या अडचणींत वाढ; दिशाच्या वडिलांनी केली पोलीस तक्रार
2 पार्श्वगायक एस. पी. बालसुब्रमण्यम यांची प्रकृती खालावली
3 मुंबईकडे लक्ष द्या म्हणत अभिनेत्रीचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना आवाहन
Just Now!
X