23 September 2019

News Flash

अखेर ११ महिने ११ दिवसांनंतर ऋषी कपूर परतले मायदेशी

त्यांचे विमानतळावरील काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत

ऋषी कपूर

बॉलिवूड अभिनेते ऋषी कपूर गेल्या एक वर्षापासून कर्करोगाशी झूंज देत होते. ऋषी कपूर गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये कर्करोगावर उपचार घेण्यासाठी न्यूयॉर्कला रवाना झाले होते. दरम्यान त्यांना आपल्या मातृभूमीची आठवण येत असल्याचे त्यांनी सोशल मीडियाद्वारे म्हटले होते. अनेकदा त्यांनी भारतात परत येण्याची इच्छादेखील व्यक्त केली होती. मात्र ऋषी यांचा नाईलाज होता. अखेर ऋषी कपूर यांची कर्करोगाची झूंज संपली असून ते भारतात परलते आहेत. चाहत्यांसाठी ही आनंदाची बाब आहे. त्यांचे विमानतळावरील काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोमध्ये त्यांच्यासोबत त्यांची पत्नी नीतू कपूरदेखील दिसत आहे. दरम्यान ऋषी कपूर यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्यासारखा आहे.

तसेच ऋषी कपूर यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटद्वारे ते भारतात परतत असल्याचे सांगितले. ‘११ महिने ११ दिवसांनंतर मी घरी परतलो. तुम्हा सर्वांचे आभार’ असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. त्यांच्या या ट्विटवर चाहत्यांनी कमेंटचा वर्षाव करत त्यांचे स्वागत केले आहे.

ऋषी कपूर यांच्या मायदेशी परतण्याने अनेक बॉलिवूड कलाकरांनादेखील आनंद झाला आहे. अनुपम खेर यांनी ट्विट करत ऋषी कपूर यांचे स्वागत केले आहे. ‘वर्षभर कर्करोगवर उपचार घेत न्यूयॉर्कमध्ये राहून भारतात परतण्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. मला आता आनंद ही होत आणि दु:खही होत आहे. मी तुम्हा दोघांना खूप मिस करेन. आपण एकत्र खूप चांगला वेळ घालवला’ असे त्यांनी ट्विटमध्ये लिहिले होते.

आणखी वाचा : …म्हणून अनुराग कश्यपला ‘तेरे नाम’मधून काढून टाकण्यात आले

ऋषी कपूर यांना कर्करोगावर मात करण्यासाठी त्यांची पत्नी नीतू कपूर यांनी साथ दिली होती. गेल्या एक वर्षापासून नीतू कपूरदेखील न्यूयॉर्कमध्ये ऋषी कपूर यांची काळजी घेत होत्या. दरम्यान अनेक बॉलिवूड कलाकरांनी देखील ऋषी कपूर यांची तब्बेत जाणून घेण्यासाठी त्यांची भेट घेतली होती. यामध्ये शाहरुख खान, अर्जुन कपूर, मलायका अरोरा आणि अनुपम खेर, दीपिका पदुकोण यांचा समावेश आहे. अखेर ऋषी कपूर कर्करोगावर मात करुन मायदेशी परतले आहेत.

First Published on September 10, 2019 12:51 pm

Web Title: rishi kapoor back to india rishi kapoor cancer treatment ends avb 95