News Flash

आर के स्टुडिओच्या गणेश विसर्जना दरम्यान कपूर बंधूंची दादागिरी, पत्रकाराला धक्काबुक्की

रणधीर कपूर आणि ऋषी कपूर यांची स्टुडिओमधली दादागिरी अनेकांसमोर आली आहे

आर.के. स्टुडिओच्या गणेश विसर्जनादरम्यान कपूर बंधूच्या दादागिरीचा ‘प्रसाद’ पत्रकार आणि चाहत्याला घ्यावा लागला. रणधीर कपूर यांनी एका पत्रकाराला तर ऋषी कपूर यांनी चाहत्याला आणि पत्रकाराला धक्काबुक्की केल्याचे समोर आले आहे. कपूर बंधूंची ही दादागिरी कॅमे-यात कैद झाली आहे.

आर  के स्टुडिओमध्ये गेली अनेक वर्षांपासून जल्लोषात गणेशोत्सव साजरा केला जातो. राज कपूरपासून सुरु झालेली ही परंपरा त्यांची मुलं रणधीर कपूर आणि ऋषी कपूर यांनीदेखील तितक्याच समर्थपणे पुढे नेली. आर. के स्टुडिओमध्ये ११ दिवसांसाठी विराजमान होणाऱ्या या गणपतीच्या विसर्जनाला आज धक्काबुक्कीचे गालबोट लागले. रणधीर कपूर आणि ऋषी कपूर यांची स्टुडिओमधली दादागिरी आली आहे. गणपतीची विसर्जनासाठी मिरवणूक निघाली असता ‘ई २४’ या वाहिनीचा पत्रकार रणधीर कपूर यांची मुलाखत घ्यायला गेला. पण तो पत्रकार प्रतिक्रिया विचारत असतानाच रणधीर कपूर यांनी काहीही न बोलता त्याला धक्काबुक्की केली. याशिवाय प्रतिक्रिया घेण्यासाठी ऋषी कपूर यांच्या गाडीजवळ गेलेल्या एका पत्रकाराला त्यांनी धक्काबुक्की केल्याचे कळते. ऋषी कपूर यांनी त्यांचा राग एका चाहत्यावरही काढला. गणपतीची आरती झाल्यानंतर जेव्हा गणपती विसर्जनासाठी बाहेर काढण्यात आला तेव्हा एक चाहता ऋषी कपूर यांच्याबरोबर सेल्फी काढण्यासाठी पुढे आला. पण त्या चाहत्याला ऋषी कपूर यांनी धक्का देत मागे ढकलले. गणपती विसर्जनावेळी मुंबई हा प्रकार घडल्यामुळे कपूर बंधूंची दादागिरी समोर आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 15, 2016 8:16 pm

Web Title: rishi kapoor beats journalist during ganparti immersion
Next Stories
1 ‘ए दिल है मुश्किल’चा शेवट कळला?
2 उलगडले दीपिकाच्या ‘पद्मावती’ सिनेमाचे रहस्य
3 ‘दंगल’साठी दलेर मेहंदीने गायले उत्साहवर्धक गाणे
Just Now!
X