बॉलिवडूचे लोकप्रिय अभिनेते ऋषी कपूर यांची आज पहिली पुण्यतिथी आहे. दोन वर्ष कॅन्सरशी लढा दिल्यानंतर ऋषी कपूर यांनी 30 एप्रिल 2020 ला अखेरचा श्वास घेतला. दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांनी त्यांच्या अभिनयाने कायमच प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. या जगाचा त्यांनी निरोप घेतला असला तरी त्यांच्या आठवणी चाहत्यांच्या मनावर कोरल्या गेल्या आहेत.

ऋषी कपूर यांनी त्यांच्या ‘खुल्लम खुल्ला’ या आत्मचरित्रात अनेक गोष्टींचा खुलास केला आहे. यातच त्यांनी दाउदा इब्राहमच्या भेटीचा अनुभव मांडला आहे.

दाऊदसोबतची ती भेट…
‘खुल्लम खुल्ला’ या पुस्तकात ते त्यांनी लिहलंय. ” ही १९८८ सालातील गोष्ट आहे. माझा जवळचा मित्र बिट्टू आनंद याच्यासोबत मी आशा भोसले आणि आरडी बर्मन यांच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी दुबईला आलो होतो. दाऊदचा एक माणूस नेहमीच विमानतळावर असायचा. मी तेथून जातो होते त्यावेळी एक अनोळखी व्यक्ती माझ्याजवळ आली. त्याने मला फोन दिला आणि म्हटलं, दाऊद साहेब तुमच्याशी बोलतील. त्यानंतर माझी एका गो-या, जाडं असलेल्या व्यक्तिशी भेट करून देण्यात आली. तो ब्रिटीश वाटत होता. तो दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख असलेला बाबा होता. तो मला म्हणाला की, दाऊद साहेबांना तुमच्यासोबत चहा प्यायचा आहे. मला यात चुकीच वाटलं नाही. त्यामुळे मी ते आमंत्रण स्वीकारलं. त्या संध्याकाळी मला आणि बिट्टूला एका चमकत्या रोल्स रॉयस गाडीमधून हॉटेलवरून नेण्यात आले. आमची गाडी उलटसुलट जात असल्याचे मला जाताना लक्षात आले. त्यामुळे मी त्याच्या घराचं निश्चित स्थान सांगू शकत नाही.”

तो म्हणाला मला पश्चाताप होत नाही!
दाऊद पांढ-या रंगाच्या इटालियन कपड्यांमध्ये माझ्यासमोर आला. त्याने आमचे स्वागत केले. आमची क्षमा मागण्याच्या अंदाजात तो म्हणाला, मी मद्यपान करत नसल्यामुळे तुम्हाला चहासाठी बोलावले. त्यानंतर आमचे चहापान जवळपास चार तास चालले. यावेळी त्याने अनेक गोष्टींवर माझ्याशी चर्चा केली. तसेच, त्याने केलेल्या अपराधांविषयी त्याला पश्चाताप नसल्याचे म्हटले. माझे स्वागत करत त्याने कोणत्याही गोष्टीची गरज असल्याचे मला सांगा असे म्हटले. त्याचसोबत मला त्याच्या घरी येण्याचे आमंत्रणही दिले, हे ऐकून मी चकीत झालो. पुढे तो म्हणाला की, मी छोट्या मोठ्या चो-या केल्या आहेत. पण कोणालाही जीवे मारले नाही. हा पण मी एकाला मारण्याचे आदेश दिले होते. एका व्यक्तिने त्याच्याशी खोटे बोलल्यामुळे त्याला गोळी मारण्याचे आदेश त्याने दिले होते. त्याने काय सांगितले ते मला नीट आठवत नाही. तो व्यक्ती कदाचित अल्लाहच्या आदेशाच्या विरोधात गेल्याने त्याने असे केले असावे. मी अल्लाहचा संदेशवाहक होतो. त्यामुळे आम्ही सगळ्यात आधी त्या व्यक्तिच्या जीभेवर गोळी मारली आणि नंतर डोक्यात, असे दाऊद म्हणाला.”

‘तवायफ’ चित्रपटातील ऋषीची भूमिका दाऊदला आवडली
मी ‘तवायफ’ चित्रपटात त्याला खूप आवडलो होतो. कारण, त्या चित्रपटात माझे नाव दाऊद असे होते. माझे वडिल आणि काका यांचेही काम त्याला आवडत असल्याचे तो म्हणाला. दाऊदच्या घरी जाताना मला भीती वाटत होती. पण, संध्याकाळ होईपर्यंत माझ्या मनातील भीती कमी झाली.