25 February 2021

News Flash

‘उपचारासाठी संयम नाही’, ऋषी कपूर यांची खंत

ऋषी कपूर यांना कॅन्सर झाल्याची चर्चा रंगली होती.

ऋषी कपूर

आपल्या वादग्रस्त ट्विटमुळे कायम चर्चेत राहणारा बॉलिवूडचा एव्हरग्रीन अभिनेता ऋषी कपूर सध्या एका मोठ्या आजाराशी झुंज देत आहेत. त्यांच्यावर न्युयॉर्कमध्ये उपचार सुरु असून त्यांचे कुटुंबीय त्यांच्या प्रकृतीची सतत सोशल मीडियावर माहिती देत असतात. मात्र त्यांना नक्की कोणता आजार झाला आहे हे स्पष्टपणे कोणीही सांगितलं नव्हतं. मात्र आता खुद्द ऋषी कपूर यांनीच त्यांच्या आजारपणाविषयी एक मोठा खुलासा केला आहे.

‘मी पहिल्यांदाच माझ्या आजारपणाविषयी खुलेपणाने बोलत आहे. आधीपेक्षा आता माझ्या तब्येतीत बरीच सुधारणा झाली आहे. सध्या मी आराम करत असून पुढील काही दिवस काम करणार नाही. आरामासोबतच उपचारही सुरुच आहेत’,असं ऋषी कपूर म्हणाले. एका मुलाखतीमध्ये ते प्रथमच आपल्या आजारपणाविषयी खुलेपणाने बोलत होते.

पुढे ते असंही म्हणाले, ‘देवाच्या कृपेने मी आता बरा आहे. माझ्यात हळूहळू सुधारणा होत आहे. त्यामुळे लवकरच परत कामाकडे वळेन. मात्र या उपचारामुळे मी प्रचंड थकलो आहे. हा उपचाराचा प्रवास आणखी पुढेही काही काळ असाच सुरु राहणार आहे. हे सारं सहन करण्यासाठी संयम लागतो. पण तो माझ्या स्वभावात नाही’.

दरम्यान, ऋषी कपूर यांना कॅन्सर झाल्याची चर्चा रंगली होती. मात्र कपूर कुटुंबीयांनी ही अफवा असल्याचं स्पष्टपणे म्हटलं होतं. काही दिवसांपूर्वी नव्या वर्षाच्या सेलिब्रेशनचा एक फोटो नीतू सिंग यांनी आपल्या सोशल अकाऊंटवर शेअर केला होता. या फोटोला त्यांनी एक ‘सूचक’ कॅप्शनही दिलं होतं. ‘नवीन वर्षात कोणताही नवा संकल्प नाही. फक्त एक इच्छा आहे. कॅन्सर हे फक्त राशीचंच नाव असावं, हा आजार कोणालाही नसावा. नवीन वर्षात सगळ्यांना आनंद आणि भरपूर प्रेम दे. गरिबी नष्ट होऊ दे’, असं नीतू यांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं होतं.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 27, 2019 4:36 pm

Web Title: rishi kapoor opens about his treatment newyork
Next Stories
1 मराठमोळी अभिनेत्री ईशा कोप्पीकर करणार भाजपात प्रवेश
2 पहिल्यांदाच मिशी कापली, तेही फक्त बाळासाहेबांसाठी – प्रविण तरडे
3 Video : अग्निपथ ! अग्निपथ! अग्निपथ! हृतिक झाला भावूक
Just Now!
X