News Flash

कॅन्सरवरील उपचारानंतर ऋषी कपूर यांचं बॉलिवूडमध्ये कमबॅक

ऋषी कपूर यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे

ऋषी कपूर

ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर गेल्या काही महिन्यांपासून न्यूयॉर्कमध्ये आहेत. न्यूयॉर्कमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांचे कुटुंबीय प्रकृतीची माहिती सतत सोशल मीडियावर देत असतात. ऋषी कपूर यांना कॅन्सर झाला आहे. त्यामुळे त्यांचे चाहते, आप्तेष्ट त्यांच्या निरोगी आयुष्यासाठी प्रार्थना करत आहेत. त्यातच आता ऋषी कपूर यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असून ते लवकरच एका चित्रपटामध्ये झळकणार आहेत. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे.

ऋषी कपूर ‘झूठा कहीं का’ या चित्रपटामध्ये झळकणार असून हा चित्रपट १९ जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटामध्ये त्यांच्यासोबत ओमकार कपूर, समी सिंह आणि जिमी शेरगिल स्क्रीन शेअर करणार आहे. हा एक कॉमेडी चित्रपट असणार आहे. या चित्रपटाचं नवीन पोस्टर तरण आदर्श यांनी शेअर केलं आहे.

शेअर केलेल्या या पोस्टरमध्ये ऋषी कपूर आणि जिमी शेरगिल दिसत असून त्यांनी अंगाभोवती लायटींग गुंडाळली आहे. तर सनी सिंह आणि ओमकार कपूर यांनी डोक्यावर एक मजेशीर अंदाजातील टोपी घातली आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन समीप कांग करत आहेत.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 27, 2019 3:38 pm

Web Title: rishi kapoor returns to cinema halls on 19 july 2019 ssj 93
Next Stories
1 आजोबांच्या भूमिकेतील या अभिनेत्रीला ओळखलंत का?
2 हॉट फोटोंवर येणाऱ्या कमेंटविषयी नीना गुप्ता म्हणतात…
3 केतकी चितळेला अश्लील भाषेत ट्रोल केल्याप्रकरणी एक जण अटकेत
Just Now!
X