अभिनेते ऋषी कपूर यांनी नुकताच त्यंचा वाढदिवस साजरा केला. चाहत्यांपासून ते बॉलिवूड कलाकारांपर्यंत सर्वांनीच त्यांनी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असणाऱ्या ऋषी कपूर यांच्यावर काही विनोदी टिप्पणी सुद्धा करण्यात आली. दरम्यान अनेक कलाकार ऋषी कपूर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असतानाच अभिनेत्री ट्विंकल खन्नाने त्यांची थट्टा करणारे एक ट्विट करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. ‘तुम्हाला उदंड आयुष्य लाभो, आता नीतू आन्टीला त्रास देणं बंद करा’ असे ट्विट तिने केले होते.
ट्विंकलच्या या धम्माल ट्विटला उत्तर देत ‘आभारी आहे. नीतूलातर मी नंतर पाहीन, पण आधी तू माझी थट्टा करणं, मला त्रास देणं बंद कर’ असे ऋषी कपूर म्हणाले. या दोन्ही कलाकारांचे हे ट्विट्स सोशल मीडियावर चर्चेत होते. याआधीही ट्विंकल खन्ना आणि ऋषी कपूर यांनी ट्विटरच्या माध्यमातून एकमेकांची खिल्ली उडवली होती. ट्विंकलच्या वाढदिवशी तिला शुभेच्छा देत एक मजेशीर ट्विट केले होते. ‘तेव्हा तू तुझ्या आईच्या पोटात होतीस ज्यावेळी मी १९७३ ला प्रदर्शित झालेल्या ‘अक्सर कोई लडका’ या गाण्याने तुझ्या आईला रिझवण्याचा प्रयत्न करत होतो’, असे ट्विट त्यांनी केले होते. पण त्यांच्या त्या एका ट्विटवर अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. हे प्रकरण शेवटी खुद्द ट्विंकलनेच मध्यस्ती करत मोडित काढले होते. ‘या विषयावर इतकी चर्चा का होत आहे, मला तर ऋषी अंकलचे ट्विट फार आवडले’ अशी प्रतिक्रिया ट्विंकलने दिली होती.
Happy birthday @chintskap uncle ! May you get older, wiser and stop troubling Neetu aunty so much 🙂
— Twinkle Khanna (@mrsfunnybones) September 4, 2016
Thank you. Neetu ko toh baad mein dekh loonga first you stop bullying me! https://t.co/xfaxN69YQy
— Rishi Kapoor (@chintskap) September 4, 2016
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on September 6, 2016 12:54 pm