21 October 2020

News Flash

अभिनेता की अभिनेत्री? ओळखून दाखवाच…

ओळखा पाहू हा फोटो कोणाचा आहे?

बॉलिवूडमधील जेष्ठ अभिनेते ऋषी कपूर सध्या आपल्या चित्रपटांपेक्षा अधिक सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत राहातात. यावेळी त्यांनी नेटकऱ्यांना गोंधळात पाडणारा एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमधील व्यक्तिला ओळखण्याचे आव्हान त्यांनी आपल्या चाहत्यांना दिले आहे.

अवश्य वाचा – “मन्नत’मध्ये एक खोली भाड्याने हवी’; नेटकऱ्याच्या मागणीला शाहरुखचं भन्नाट उत्तर

अवश्य वाचा – आयुषमान खुरानाने केला बॉयफ्रेंडला किस; व्हिडीओ व्हायरल..

ओळखा पाहू हा फोटो कोणाचा आहे? अशा आशयाची पोस्ट लिहून ऋषी कपूर यांनी वरील फोटो शेअर केला आहे. तसेच ज्यांना उत्तर माहित असेल त्यांनी इतरांना सांगू नका. त्यांना देखील विचार करायला भाग पाडा. अशी विनंती देखील त्यांनी केली. या फोटोवर शेकडो नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

अवश्य वाचा – बॉलिवूड अभिनेत्रींनाही लाजवेल असं २० वर्षीय या तरुणीचे सौंदर्य पाहाच…

हा फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. हजारो नेटकऱ्यांनी हा फोटो कुठल्या अभिनेत्रीचा आहे हे ओळखण्याचा खुप प्रयत्न केला. परंतु कोणालाही या अभिनेत्रीला ओळखता आले नाही. अखेर ऋषी कपूर यांनी स्वत: ट्विट करुन या प्रश्नाचे उत्तर दिले. “हा फोटो कुठल्याही अभिनेत्रीचा नाही तर बॉलिवूडमधील नामांकित अभिनेते प्राण यांचा आहे. हा त्यांच्या खासगी अल्बममधील फोटो आहे.”

ऋषी कपूर यांचे उत्तर पाहून अनेक जण चक्राऊन गेले. कारण अनेकांना हा कुठल्यातरी जुन्या अभिनेत्रीचा फोटो असल्याची शक्यता वाटत होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 23, 2020 2:11 pm

Web Title: rishi kapoor shares pic of pran dressed as a woman mppg 94
Next Stories
1 सलमानची ही हिरोईन साकारणार प्रभासच्या आईची भूमिका?
2 रितेशने विचारलं अबरामकडून काय शिकलास? शाहरुखने दिलं ‘हे’ उत्तर
3 “मन्नत’मध्ये एक खोली भाड्याने हवी’; नेटकऱ्याच्या मागणीला शाहरुखचं भन्नाट उत्तर
Just Now!
X