सैफ अली खान आणि करिना कपूर खान यांनी आपल्या मुलाचे नाव तैमुर अली खान असे ठेवले. या नावावरुन त्यांना सोशल मीडियावरुन अनेक गोष्टी ऐकायलाही लागल्या. जसे हे नाव जाहिर झाले, तशी या नावाची चर्चा सोशल मीडियावर जोरात सुरु झाली. काही ट्विटरकरांनी तिखट प्रतिक्रिया दिल्या तर काहींनी ही त्यांची वैयक्तिक गोष्ट असल्याचे सांगितले. या दरम्यान, ऋषी कपूर, करण जोहर, प्रियांका चोप्रा आणि अन्य कलाकारांनी सैफिनाची बाजू घेत ट्विटरकरांना जशास तसे उत्तर दिले. ऋषी कपूरने तर हेही म्हटलेले की, दुसऱ्यांना सल्ला देणारे तुम्ही कोण? लोकांनी त्यांच्या कामाशी काम ठेवावे. पण अजूनही या नावाबद्दलची चर्चा काही थांबण्याचे नाव घेत नाही. ऋषी कपूर या नावावरुन परत एकदा चर्चेत आले आहेत.

ऋषी कपूर यांनी एक फोटो ट्विट केला आहे. हा फोटो दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू जॉन्टी रोड्सचा आहे. जॉन्टीने आपल्या मुलीचे नाव इंडिया असे ठेवले आहे. हा फोटो पोस्ट करत ऋषी यांनी लिहिले की, हो तुम्हाला बरोबर समजलं आहे की, फक्त आई- बाबांकडेच हे हक्क असतात जे आपल्या मुलांची नावं काहीही ठेवू शकतात. ते हा फोटो दाखवून सैफ आणि करिनाच्या निर्णयाचे पुन्हा एकदा समर्थन करत होते. पण हा डाव त्यांचावरच उलटला. ट्विटरकरांनी त्यांच्या या ट्विटबद्दल चांगलीच कानउघडणी केली.

k5-2

गरिमा श्रीवास्तव नावाच्या ट्विटर युझरने लिहिले की, सर तुम्ही तैमुरची तुलना इंडियाशी करत आहात. मला नावाबद्दल कोणतीही तक्रार नाही. पण जर किरण राव आपल्या मुलाचे नाव आझाद राव खान ठेवू शकते तर करिना का नाही? तर सेक्युलर या नावाने खोटे ट्विटर अकाऊंट असणाऱ्याने लिहिले की, मग तुम्ही आणि तुमचा परिवाराने तैमुरकडून काय शिकले. बलात्कार, खून, लुटमारी आणि अत्याचार करणे?
तर डॉक्टर शोभा नावाच्या व्यक्तिने ट्विट केले की, तुम्हाला हे माहित आहे का की जॉन्टी रोड्सने आपल्या मुलीचे नाव इंडिया असे का ठेवले? तर अजून एका व्यक्तिने लिहिले की, जॉन्टीच्या संदर्भात बोलायचे झाले तर त्याने इंडियाशी प्रेरित होऊन हे नाव ठेवले. असे असेल तर सैफही तैमुरशी प्रेरित झाला का?

k1-3

k2-3

k3-3

k4-2