26 September 2020

News Flash

…अशी झाली ‘मुल्क’मध्ये ऋषी कपूर यांची एण्ट्री; अनुभव सिन्हांनी दिला आठवणींना उजाळा

या चित्रपटाला नुकतेच २ वर्ष पूर्ण झाले आहेत

कोर्टरुम ड्रामा प्रकारात मोडणारा ‘मुल्क’ हा चित्रपट साऱ्यांच्याच लक्षात असेल. अभिनेत्री तापसी पन्नू आणि दिवंगत अभिनेता ऋषी कपूर या चित्रपटत मुख्य भूमिकेत झळकले होते. ३ ऑगस्ट २०१८ ला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला नुकतेच २ वर्ष पूर्ण झाले आहेत. त्यानिमित्ताने चित्रपट दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. यात त्यांनी ऋषी कपूर यांचीही एक आठवण शेअर केली आहे.

‘मुल्क’ चित्रपटात ऋषी कपूर यांनी मुराद अली मोहम्मद ही भूमिका साकारली आहे. विशेष म्हणजे अनुभव सिन्हा यांनी या भूमिकेसाठी ऋषी कपूर यांना विचारणा केल्यावर काही क्षणाच्या आत ऋषी कपूर यांनी भूमिकेसाठी होकार दिला होता.

 

View this post on Instagram

 

Love him!!! #MULK.

A post shared by Anubhav Sinha (@anubhavsinhaa) on

“माझ्या मुल्क चित्रपटात ऋषी कपूर यांनी काम करावं म्हणून मी त्यांची भेट घेतली होती. या भेटीत मी कथा वाचत असताना केवळ १५ मिनीटांमध्ये त्यांनी काम करण्यास होकार दिला”, असं अनुभव सिन्हा म्हणाले.

पुढे ते म्हणतात, “ऋषी कपूर कायम त्यांच्या शूटच्यापूर्वी स्क्रिप्ट वाचून दाखविण्यास सांगायचे. त्यावेळी सुद्धा मी स्क्रिप्ट समजावून सांगत असताना ते काळजीपूर्वक लक्ष देऊन ऐकत असतं. विशेष म्हणजे ते करत असलेल्या सहकार्यामुळे या केवळ २७ दिवसांमध्ये चित्रीकरण पार पडलं”. दरम्यान, ऋषी कपूर यांचं निधन होऊन आता बराच काळ लोटला आहे. मात्र आजही अनेक जण त्यांच्या आठवणींना उजाळा देत असतात.

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 6, 2020 4:00 pm

Web Title: rishi kapoor starer film mulk director anubhav sinha shared some memorable thing ssj 93
Next Stories
1 ‘या’ महिन्यात येणार करोना लस; चेतन भगत यांनी केली भविष्यवाणी
2 ‘मसुटा’ मधून उलगडणार शिक्षणासाठी झटणाऱ्या कुटुंबाची कथा!
3 “चित्रपटात भूमिका मिळवण्यासाठी कोणत्याही अभिनेत्यासोबत…”, रवीनाचा खुलासा
Just Now!
X