News Flash

‘कपूर अॅण्ड सन्स’च्या ‘मेकअप’साठी ऋृषी कपूर यांना लागतात पाच तास!

अभिनेत्रींच्या मेकअप आणि टचअपसाठी लागणाऱया वेळेबाबतचे अनेक किस्से आपण ऐकले असतील.

'कपूर अॅण्ड सन्स' चित्रपटात ऋृषी कपूर यांचा मेकअप करण्यासाठी पाच तास तासांहून अधिक वेळ खर्ची होत आहेत.

अभिनेत्रींच्या मेकअप आणि टचअपसाठी लागणाऱया वेळेबाबतचे अनेक किस्से आपण ऐकले असतील. पण, ‘कपूर अॅण्ड सन्स’ चित्रपटात ऋृषी कपूर यांचा मेकअप करण्यासाठी पाच तास तासांहून अधिक वेळ लागत आहे. खुद्द ऋृषी कपूर यांनीच याबद्दलची माहिती दिली आहे.
ऋृषी कपूर दिग्दर्शक शकून बत्राच्या आगामी ‘कपूर अॅण्ड सन्स’ चित्रपटात वेगळ्या लूकमध्ये दिसणार आहेत. चित्रपटातील त्यांच्या लूकवर आंतरराष्ट्रीय ख्यातीचे आणि ऑस्कर पुरस्काराने सन्मानित झालेले मेकअप आर्टिस्ट ग्रेक कॅनम काम करत आहेत. ‘कपूर अॅण्ड सन्स’चे चित्रीकरण सुरू होण्याआधीपासूनच ऋृषी कपूर चित्रपटातील त्यांच्या लूकला घेऊन भरपूर उत्सुक होते. अखेर चित्रीकरण सुरू झाल्यानंतर सेटवर ‘मेकअप’ करतानाचे छायाचित्र ऋृषी कपूर यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केले आहे. शिवाय, मेकअपसाठी तब्बल पाच तासांहून अधिक वेळ लागत असल्याचेही कपूर यांनी ट्विटमध्ये नमूद केले आहे.
कपूर अॅण्ड सन्स हा चित्रपट पुढील वर्षी मार्च महिन्यात प्रदर्शित होण्याचा अंदाज असून, करण जोहर या चित्रपटाचा निर्मात आहे, तर ऋृषी कपूर यांच्यासोबतच अभिनेत्री आलिया भट, अभिनेता फवाद खान आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांच्याही या चित्रपटात भूमिका आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 24, 2015 12:17 pm

Web Title: rishi kapoor takes over five hours for kapoor sons get up
टॅग : Rishi Kapoor
Next Stories
1 मी इतक्यात आई होण्याच्या विचारात नाही- सनी लिओनी
2 होय, मी ‘त्याच्या’ कानशिलात लगावली होती- प्रियांका चोप्रा
3 ‘सोनी गिल्ड अवॉर्ड’ सोहळ्यात ‘बाजीराव-मस्तानी’ला सर्वाधिक पुरस्कार
Just Now!
X