देशातील करोना व्हायरचा वाढता संसर्ग बघता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २४ मार्च रोजी संपूर्ण देशात लॉकडाउन जाहीर केले आहे. अत्यावश्यक सेवा वगळता दुकाने, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पूर्णपणे बंद करणयात आली आहे. लॉकडाउनमध्ये दारुविक्रीवरही बंदी आहे. राज्य सरकारने मद्यविक्री सुरू ठेवावी अशी मागणी ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विट केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘राज्य सरकारला उत्पादन शुल्क विभागाकडून पैशांची फार गरज आहे. संतापात नैराश्याची भर पडू नये. जसे आधी मद्यपान करायचे तसे लोक करतच आहेत तर कायदेशीर करून टाका. ढोंगीपणा करू नका. असे माझे विचार आहेत’, असं त्यांनी ट्विटरवर म्हटलंय. त्यांच्या या ट्विटमुळे नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोलसुद्धा केलं आहे. लॉकडाउनला कोणीच गंभीरपणे पाहत नाही, सेलिब्रिटीसुद्धा नाही, असं एका युजरने म्हटलंय तर काहींनी त्यांची खिल्लीसुद्धा उडवली आहे.

लॉकडाउनची घोषणा झाल्यानंतर एका नेटकऱ्याने ऋषी कपूर यांना विचारलं होतं, ‘दारू का कोटा फुल है ना सर’. त्यावर ‘हा आणखी एक मूर्ख माणूस’ म्हणत त्यांनी सुनावलं होतं.

देशात आणि राज्यात लॉकडाउन असल्यामुळे अत्यावश्यक सेवा आणि जीवनावश्यक वस्तुंच्या विक्री व्यतिरिक्त सर्व काही बंद आहे. विशेषतः मद्यपान करणाऱ्यांची या निर्णयामुळे मोठी अडचण होऊन बसली आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rishi kapoor tweet on no liquor in lockdown ssv
First published on: 28-03-2020 at 14:00 IST