देशातील करोना व्हायरचा वाढता संसर्ग बघता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २४ मार्च रोजी संपूर्ण देशात लॉकडाउन जाहीर केले आहे. अत्यावश्यक सेवा वगळता दुकाने, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पूर्णपणे बंद करणयात आली आहे. मोदींच्या या निर्णयाला सर्वच स्तरांमधून पाठिंबा मिळाला. अनेक बॉलिवूड कलाकारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून मोदींच्या निर्णयाला पाठिंबा दिला. पण अभिनेते ऋषि कपूर यांना एका यूजरने विचारलेल्या प्रश्नाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

मोदींच्या २१ दिवसाच्या लॉकडाउनच्या निर्णयाला पाठिंबा देत ऋषि कपूर यांनी ट्विट केले होते. त्यावर एका नेटकऱ्याने ‘दारु का कोटा फुल है ना चिंटू चाचा’ असा प्रश्न त्यांना विचारला होता. त्यावर ऋषी कपूर यांनी त्यांच्या अंदाजात नेटकऱ्याला चांगलेच सुनावले आहे.

‘दारु का कोटा फुल है ना चिंटू चाचा’ असा प्रश्न विचारणाऱ्याला ऋषि कपूरने ‘ये एक और इडियट’ असे म्हणत सुनावले आहे.

करोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २१ दिवसांसाठी संपूर्ण देशात लॉकडाउनची घोषणा केली. करोनाला रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग ठेवणे हा एकमेव उपाय असल्याचे मोदींनी सांगितले. सर्व जनतेने पुढील २१ दिवस घरातच राहावे अशी विनंती मोदींनी देशातील लोकांना केली. तसेच राज्यातील करोनाग्रस्तांची संख्या ११६ वर पोहोचली आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याबाबत माहिती दिली.