News Flash

ऋषी सक्सेनाची वेब सीरिज चर्चेत, मिळतोय प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद

'हंगामा प्ले' या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाली आहे

‘काहे दिया परदेस’ या मालिकेतून चाहत्यांच्या मनावर राज्य करणारा अभिनेता म्हणजे ऋषी सक्सेना. नुकतीच त्याची ‘गुडबॉय’ ही वेब सीरिज प्रदर्शित झाली आहे. उत्तम कथानक, दमदार स्टारकास्ट असलेल्या ‘गुडबॉय’ या नव्या वेब सीरीजला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. ‘हंगामा प्ले’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालेल्या या वेब सिरिजबद्दल अतिशय धमाल, फुल ऑन एंटरटेनिंग अशा शब्दांत प्रेक्षकांनी ‘गुडबॉय’चे कौतुक केले आहे.

‘गूडबॉय’ या सीरिजमध्ये कॉलेजपासून सतत मुलींच्या मागे असलेल्या तरुणाला खऱ्या प्रेमाचा शोध आहे अशी कथा दाखवण्यात आली आहे. मात्र त्याच्याविषयी मुलींमध्ये एक वेगळाच समज निर्माण होतो आणि तो अडचणीत येतो. हा समज नेमका काय आहे? आणि यातून त्याच्या अडचणी कशा वाढत जातात? या अडचणीतून बाहेर पडण्यासाठी तो काय करतो? त्यातून तो यशस्वी होतो का? त्याला खरं प्रेम मिळतं का? अशा प्रश्नांची उत्तरे वेब सीरीज पाहिल्यावरच मिळतील. धमाल कथानक, उत्तम अभिनय आणि प्रत्येक एपिसोडला निर्माण होणारी उत्सुकता ही या सीरिजची वैशिष्ट्ये आहेत. त्यामुळेच ही सीरीज प्रेक्षकांच्या पसंतीला उतरली आहे.

‘गुडबॉय’ या वेब सीरिजची निर्मिती कॅफेमराठीच्या निखिल रायबोले आणि भुपेंद्रकुमार नंदन यांनी केली आहे. या वेब सीरिजमध्ये ऋषी सक्सेना, खुशबू तावडे, विनय येडेकर, रीना अगरवाल, दुष्यंत वाघ, योगेश सोहोनी,अभ्यंग कुवळेकर आदींच्या प्रमुख भूमिका आहेत. बद्रिश पाटील यांनी या सीरिजचे दिग्दर्शन केले आहे. सौरभ मास्तोळी यांनी संगीत दिग्दर्शन, अक्षय राणे यांनी छायांकनाची जबाबदारी निभावली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 19, 2021 2:18 pm

Web Title: rishi saxsena goodboy web series avb 95
Next Stories
1 दक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबूसोबत जान्हवी कपूर करणार काम?
2 नेमप्लेटवर विरुष्कासोबत वामिकाचे नाव
3 पुन्हा ‘scam’, अभिषेकच्या ‘The Big Bull’चा जबरदस्त ट्रेलर प्रदर्शित
Just Now!
X