News Flash

रितेश-जेनेलियाला पुन्हा पुत्ररत्न

रितेशने आपल्या चिमुकला रिआनचा फोटो ट्विट करून त्याच्या लहान भावाचे घरात आगमन झाल्याचे म्हटले आहे.

रितेश आणि जेनेलिया

अभिनेता रितेश देशमुखच्या घरी आणखी एका नव्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. रितेशची पत्नी जेनेलिया हिने दुसऱया बाळाला जन्म दिला आहे. रितेशने ही गोड बातमी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून आपल्या चाहत्यांना दिली. रितेशने आपल्या चिमुकला रिआनचा फोटो ट्विट करून त्याच्या लहान भावाचे घरात आगमन झाल्याचे म्हटले आहे. याशिवाय, माझी सगळी खेळणी आता त्याची होणार, असे म्हणत रिआन आपल्या लहान भावाचे स्वागत करत असल्याचेही रितेशने ट्विटमध्ये नमूद केले आहे.

WATCH VIDEO: कपड्यांची चोरी करताना रितेश सीसीटीव्हीमध्ये कैद!

जेनेलियाने २४ नोव्हेंबर २०१४ रोजी पहिला मुलगा रिआनला जन्म दिला होता. त्यानंतर रिआन वर्षभराचा असताना रितेश-जेनेलिया पुन्हा एकदा गोड बातमी देणार असल्याचे स्पष्ट झाले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 1, 2016 10:32 am

Web Title: riteish and genelia blessed with a baby boy
Next Stories
1 VIDEO: ‘सुलतान’मधील ‘बेबी को बेस पसंद है’ गाणे
2 तन्मय भटच्या व्हिडिओवर लता मंगेशकर यांची प्रतिक्रिया
3 ‘एरियल सिल्क नृत्य’ चौकटीबाहेरील नृत्यप्रकार – उर्मिला
Just Now!
X