30 September 2020

News Flash

चित्रपट न आवडल्याने रितेशने चाहत्याला परत दिले पैसे, पहा ट्विट

रितेशने नुकताच एका चाहत्याला ट्विटरवर मजेशीर रिप्लाय दिला आहे.

रितेश देशमुख

सोशल मीडियावर कलाकारांना अनेकदा ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. कलाकारांचे चाहते ट्विटरवर आणि इंस्टाग्रामवर त्यांना फॉलो करत असतात. एखादा चित्रपट आवडला नाही तर ट्विटरवर प्रेक्षक त्यांच्या प्रतिक्रिया देतात. ट्रोलिंग हे कलाकारांना नवीन नसल्याने कलाकार त्याकडे फार लक्ष देत नाहीत. पण, अनेक कलाकार त्यांच्या चाहत्यांना मजेशीर रिप्लाय देतात.

अभिनेता रितेश देशमुखने नुकताच एका चाहत्याला ट्विटरवर मजेशीर रिप्लाय दिला आहे. एका चाहत्याने ट्विटरवर रितेशला टॅग करत एक कमेंट केली आहे. त्याने ‘बँगिस्तान’ हा चित्रपट पाहिला आणि त्याला पैसे परत हवे आहेत.’ असं त्याने लिहिले आहे. रितेशने ही कमेंट वाचून त्याला लगेचच रिप्लाय दिला आहे. त्याने १००० ची नोट या चाहत्याला दिली आहे.

हा चित्रपट २०१५ मध्ये आला होता. रितेशने १००० ची नोटही २०१५ सालचीच दिली आहे. ही नोट जुनी असून सध्या वापरात नाही. या नोटेच्या फोटोसोबतच रितेशने लिहिले आहे की, ‘हे घे पैसे. स्नॅक्सचे पैसे पण यातूनच घे.’

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 13, 2019 1:00 pm

Web Title: riteish deshmukh 1000 note fan bangistan djj 97
Next Stories
1 तापसी अक्षयला का म्हणतेय, ‘अब शेअररिंग अॅण्ड केअरिंग की बारी है’
2 अफेअरच्या चर्चांबाबत परिणीती चोप्रा म्हणतेय ..
3 Photo : जॉन सीनाने शेअर केलेल्या मीम्सवर शिल्पा शेट्टीने दिली ‘ही’ प्रतिक्रिया
Just Now!
X