News Flash

‘पावरी हो रही है’ स्टाईलमध्ये रितेशने शेअर केला व्हिडीओ, पाहा व्हिडीओ

रितेशचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

‘पावरी हो रही है’ स्टाईलमध्ये रितेशने शेअर केला व्हिडीओ, पाहा व्हिडीओ

सध्या सोशल मीडियावर सगळीकडे ‘पावरी हो रही है’ हा ट्रेन्ड सुरू आहे. यात सर्वसामान्यांपासून बॉलिवूड कलाकारांपर्यंत सगळे व्हिडीओ करत आहेत. त्यात आता अभिनेता रितेश देशमुख आणि पत्नी अभिनेत्री जेनेलिया डिसूजा यांनी देखील यावर व्हिडीओ केला आहे. त्यांनी त्यांच्या स्टाईलमध्ये ‘पावरी हो रही है’ व्हिडीओ शेअर केला आहे. रितेशने त्याच्या कुत्र्याचा वाढदिवस पावरी स्टाईलमध्ये केला आहे. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे.

रितेशने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून पावरी स्टाईलमध्ये हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत रितेश, जेनेलिया त्यांची मुलं आणि आणखी काही लोक दिसत आहेत. या व्हिडीओत रितेश आधी फ्लॅश म्हणजेच त्याचा पाळीव कुत्र्याला दाखवतो, नंतर स्वत: ला दाखवतो आणि मग सगळ्यांना दाखवतो. व्हिडीओत रितेश बोलतो “हा फ्लॅश आहे, हा मी आहे आणि ही आमची पार्टी होत आहे.” फ्लॅश वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा, असं रितेश बोलतो. “वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा फ्लॅश,” अशा आशयाचे कॅप्शन रितेशने त्या व्हिडीओला दिले आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ २ लाख पेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Riteish Deshmukh (@riteishd)

 

View this post on Instagram

 

A post shared by Genelia Deshmukh (@geneliad)

जेनेलियाने देखील फ्लॅशच्या वाढदिवसानिमित्ताने त्याच्या सोबत एक व्हिडीओ शेअर केला होता. तिचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता.

बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडींपैकी एक म्हणून रितेश आणि जेनेलियाकडे पाहिलं जातं. ‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटात एकत्र काम असताना हे दोघे रिलेशनशिपमध्ये आले. त्यानंतर ३ फेब्रुवारी २०१२ मध्ये ते लग्नाच्या पवित्र बंधनात अडकले. रितेश आणि जेनेलिया सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. ते नेहमीच सोशल मीडियवर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 26, 2021 7:28 pm

Web Title: riteish deshmukh celebrated his dogs birthday in pawri style dcp 98
Next Stories
1 ‘या’ कारणामुळे शर्मिला यांनी अजूनही पाहिले नाही सैफ-करीनाच्या दुसऱ्या बाळाला
2 ऑस्करच्या यादीत आणखी एक भारतीय सिनेमा; सूर्याच्या ‘सोहराई पोटरू’ची निवड
3 1962 द वॉर इन द हिल्स; भारत चीन युद्धाची गौरवगाथा रंगवणारी वेब सीरिज
Just Now!
X