News Flash

Video : ‘एक नारळ दिलाय…’, आगरी गाण्यावर रितेशचा भन्नाट डान्स

सध्या त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी अभिनेत्री जेनेलिया डिसूजा हे दोघेही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. ते सतत त्यांचे व्हिडीओ आणि फोटो चाहत्यांसोबत शेअर करताना दिसतात. आता रितेशचा एका आगरी गाण्यावर डान्स करताचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

सध्या सोशल मीडियावर अनेकजण ‘एक नारळ दिलाय दर्या देवाला’ या गाण्यावर डान्स करतानाचे व्हिडीओ शेअर करताना दिसत आहेत. रितेशने देखील या गाण्यावर लिप्सिंग करुन डान्स केला आहे. सध्या त्याचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला असून चाहत्यांनी व्हिडीओवर लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Riteish Deshmukh (@riteishd)

आणखी वाचा : ही गोड मुलगी करतेय प्रेक्षकांच्या मनावर राज्य; ओळखलं का ‘या’ अभिनेत्रीला?

रितेशने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर डान्स करतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत ‘या गाण्याच्या मी प्रेमात पडलोय. धृवन मोर्थी आणि प्रित बंद्रे’ या आशयाचे कॅप्शन दिले आहे. हा व्हिडीओ आता पर्यंत ३ लाख पेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे.

सध्या सोशल मीडियावर ट्रेंड होत असलेले गाणे ‘एक नारळ दिलाय दर्या देवाला’ धृवन मोर्थी आणि प्रित बंद्रे या संगीतकारांनी तयार केले आहे. हे गाणे प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतर असल्याचे दिसत आहे. संगितकार प्रितने रितेशचा हा व्हिडीओ शेअर केला असून कौतुक केले आहे.

यापूर्वी या गाण्यावर मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराह, पंड्या बंधू यांनी डान्स केला होता. या व्हिडिओला सोशल मीडियावर चाहत्यांनी भन्नाट प्रतिसाद दिला होता. खरे तर, या व्हिडिओतील गाणे आणि डान्स वेगळा असून चांहत्यांना कोणाची स्टेप जास्त आवडली, असा सवाल मुंबई इंडियन्स या इन्स्टाग्राम पेजने कॅप्शनमध्ये विचारला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 14, 2021 6:45 pm

Web Title: riteish deshmukh dance on marathi song ek naral dilay darya devala video viral avb 95
Next Stories
1 भारतरत्न लता मंगेशकर यांचं रसिकांसाठी गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर सुरेल सरप्राईझ
2 लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार ‘बिबट्या’; सिनेमाचं पहिलं पोस्टर रिलीज
3 “राजकीय सभा बहुतेक अत्यावश्यक सेवेत येत असाव्यात” – मुन्नाभैय्या त्रिपाठी
Just Now!
X