News Flash

..अन् ‘त्या’ क्षणापासून सुरु झाला रितेश-जेनेलियाच्या प्रेमाचा प्रवास

जेव्हा दोघं बोलायला लागले तेव्हा जेनेलियाने रितेशला पहिला प्रश्न हाच विचारला की...

बॉलिवूडमधील ‘क्यूट कपल’ म्हणून जेनेलिया आणि रितेश देशमुख या जोडीकडे पाहिले जाते. बऱ्याच वर्षांची मैत्री आणि त्यानंतर लग्न अशी त्यांची प्रेमकहाणी अनेकांना माहितच असेल. या जोडीचा संसार गुण्या गोविद्यांने सुरु आहे. अर्थात या जोडीकडे पाहिले की जेनेलिया आणि रितेश एकमेकांसाठीच बनले आहेत, असे कोणीही मान्य करेल. या दोघांची प्रेमकहाणीही रंजक आहे. एका चित्रपटाच्या सेटवर पहिल्यांदा रितेश आणि जेनेलियाची ओळख झाली पण दोघांमध्ये मैत्री व्हायलाही बराच वेळ लागला.

‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत रितेशने जेनेलियासोबतच्या पहिल्या भेटीची आठवण सांगितली. ‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटाच्या सेटवर दोघे पहिल्यांदा भेटले. त्यावेळी जेनेलिया सुरुवातीला रितेशसोबत बोलतही नव्हती. रितेशचे वडील मुख्यमंत्री होते, म्हणून ती बोलण्यास कचरत असल्याचे रितेशने स्पष्ट केले होते. इतकंच नव्हे तर जेव्हा ते दोघे बोलायला लागले तेव्हा जेनेलियाने त्याला पहिला प्रश्न हाच विचारला की तुझ्यासोबत सुरक्षारक्षक का नाहीत? हळूहळू त्या दोघांमध्ये मैत्री होऊ लागली आणि त्या मैत्रीचे प्रेमात रुपांतर झाले.

आणखी वाचा : ‘बाजीगर’च्या शूटिंगदरम्यान शिल्पा शेट्टीला या कारणामुळे आला होता काजोलचा राग

या दोघांच्या आनंदाचे क्षण पाहून कोणीही सहज मान्य करेल, की जेनेलियाच रितेश देशमुखचे पहिले प्रेम असावे. पण एका वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत रितेशने त्याच्या पहिल्या प्रेमाबद्दल सांगितले. त्याचे हे पहिले प्रेम म्हणजे फोटोग्राफी. त्याला फोटोग्राफीचा अफाट छंद होता. मात्र चित्रपटात पदार्पण केल्यानंतर त्याला आपल्या प्रेमाचा विसर पडला होता. जेनेलियानेच त्याला पुन्हा फोटोग्राफी करण्याचा सल्ला दिला. फक्त सल्ला देऊन न थांबता तिने त्याला कॅमेरा भेट देऊन आपल्या पतीचे हरवलेले प्रेम पुन्हा मिळवून दिले.

रितेश आणि जेनेलिया २०१२ मध्ये लग्नबंधनात अडकले असून त्यांना आता दोन मुलं आहेत. बॉलिवूडच्या सर्वांत आवडत्या कपल्समध्ये आजही या दोघांचं नाव पाहायला मिळतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 5, 2020 10:34 am

Web Title: riteish deshmukh genelia dsouza love story ssv 92
Next Stories
1 “…तर शाहरुखशी केलं असतं का लग्न?”; काजोलने दिले होत भन्नाट उत्तर
2 ‘आमच्यात मैत्रीपलिकडे एक नातं होतं, पण…’; अजय- काजोलची लव्हस्टोरी
3 राम मंदिर भूमिपूजनाच्या पार्श्वभूमीवर मराठी कलाकारांचंही ‘जय श्री राम’
Just Now!
X