News Flash

रितेश देशमुख, मधुर भांडारकर आणि अन्य बॉलीवूडकरांची आर.आर.पाटील यांना श्रद्धांजली

बॉलीवूड जगतातील रितेश देशमुख, मधुर भांडारकर आणि कैलाश खेर या सेलिब्रिटींकडून महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आर.आर. पाटील यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करण्यात आला.

| February 17, 2015 05:18 am

बॉलीवूड जगतातील रितेश देशमुख, मधुर भांडारकर आणि कैलाश खेर या सेलिब्रिटींकडून महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आर.आर. पाटील यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करण्यात आला. या सर्वांनी ट्विटरवरून आर. आर. पाटील यांना श्रद्धांजली वाहिली.
आर. आर. पाटील यांच्या निधनाची बातमी ऐकून खूप दु:ख झाले. मी त्यांच्या कुटुंबाची व्यथा आणि दु:ख समजू शकतो, अशा संदेश रितेश देशमुखने ट्विटरवर टाकला आहे. मुंबईवरील २६/११च्या दहशतवादी हल्ल्यावेळी आर. आर. पाटील राज्याचे गृहमंत्री होते. गेल्या तीन महिन्यांपासून ते कर्करोगावर उपचार घेत असून, सोमवारी संध्याकाळी त्यांचे मुंबईत निधन झाले. आर.आर. पाटील हे जनसामान्यांचे नेते आणि एक विनयशील व्यक्ती असल्याची आठवण रितेशने ट्विटरवर सांगितली. तर गायक कैलाश खेरने त्यांच्या प्रभावी नेतृत्वाची प्रशंसा करताना त्यांना संगीताची खूप आवड असल्याचे सांगितले. मी गायलेली काही गाणी आणि प्रार्थना पाटील यांना खूप आवडत असल्याचे त्यांनी एकदा मला सांगितल्याचे कैलाश खेर यांनी ट्विटरवर म्हटले. चित्रपटनिर्माता मधुर भांडारकर यांनीही आर.आर.पाटील यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत त्यांच्या आत्म्याला शांती मिळो, असे ट्विटरवरून सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 17, 2015 5:18 am

Web Title: riteish deshmukh madhur bhandarkar and other bollywood celebs mourn r r patil demise
टॅग : R R Patil
Next Stories
1 ‘परतू’ हॉलीवूडकरांची मराठी निर्मिती
2 अनुष्काने दिली ‘विराट’प्रेमाची कबुली
3 चित्रपटसृष्टीत स्थान बनविणे खूप कठीण – जॅकलिन फर्नांडिस
Just Now!
X