News Flash

पत्नीला खूश करण्यासाठी रितेशची नवी हेअरस्टाइल, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

सोशल मीडियावर ट्रोल झाल्याने रितेशलाच जणू सरप्राइज मिळाला आहे.

रितेश देशमुख

विनोदी भूमिकांतून प्रेक्षकांना खळखळून हसवणारा अभिनेता रितेश देशमुख सध्या त्याच्या नवीन लूकमुळे चर्चेत आहे. पत्नी जेनेलिया डिसूझा देशमुखला सरप्राइज देण्यासाठी रितेशने नवी हेअरस्टाइल केली. पण सोशल मीडियावर ट्रोल झाल्याने रितेशलाच जणू सरप्राइज मिळाला आहे.

रितेशच्या नव्या हेअरस्टाइलचे फोटो जेनेलियाने तिच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केले आहेत. ‘मी रितेशला नव्या लूकने सरप्राइज करायला सांगितलं होतं. तो रेड स्क्वायरल टेलच्या लूकमध्ये समोर आला. कूल आहे ना,’ असा प्रश्न जेनेलियाने या फोटोसह विचारला. त्यावर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रियांचा पाऊस पडला. अनेकांनी चेष्टा करत त्याच्या नव्या लूकची खिल्ली उडवली. तर काही युजर्स जेनेलियावरच नाराज झाले.

एका युजरने रितेशच्या नव्या लूकमधील फोटोवर प्रतिक्रिया देताना माणूस आहे की पोपट अशीच प्रतिक्रिया दिली. तर दुसऱ्याने हेअरस्टाइलचे शेपूट सोडून सर्व काही ठीक आहे असं म्हटलं. एकाने तर रितेशच्या केसांची तुलना थेट कोंबड्याच्या चोचीशी केली. रितेशला लूक बदलण्यास का सांगितलं असा प्रश्न विचारत काहींनी जेनेलियावर नाराजी व्यक्त केली.

वाचा : ..म्हणून ‘आशिकी’च्या पोस्टरमध्ये कलाकारांचे चेहरे झाकले, कारण वाचून तुम्हीही व्हाल थक्क! 

रितेशच्या चित्रपटांबद्दल बोलायचे झाल्यास, तो आगामी ‘हाऊसफुल ४’ या कॉमेडी चित्रपटात झळकणार आहे. त्याशिवाय तो ‘मरजावा’ या चित्रपटातही पाहायला मिळेल. यामध्ये त्याच्यासोबत सिद्धार्थ मल्होत्राही असेल. या दोघांनी याआधीही ‘एक व्हिलन’ या चित्रपटात सोबत काम केलं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 1, 2019 4:44 pm

Web Title: riteish deshmukh new red squirrel tail look for wife genelia and gets trolled
Next Stories
1 Photo : लहानग्या तैमुरचा टॅटू पाहिलात का ?
2 हृतिकने घेतली अ‍ॅक्शन स्टार ‘जॅकी चॅन’ यांची भेट
3 ..म्हणून ‘आशिकी’च्या पोस्टरमध्ये कलाकारांचे चेहरे झाकले, कारण वाचून तुम्हीही व्हाल थक्क!
Just Now!
X