21 January 2021

News Flash

VIDEO : नाराज मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी पोलीस आले घरी

रितेश देशमुखनं शेअर केला व्हिडीओ

अभिनेता रितेश देशमुखं सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटो आणि व्हिडीओजच्या माध्यमातून तो नेहमीच आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतो. यावेळी त्याने अमेरिकेतील पोलिसांचा एक आश्चर्यचकित करणारा व्हिडीओ पोस्ट केला आहे. करोनामुळे घरात थांबलेल्या मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी चक्क पोलिसांनी हजेरी लावली होती.

एका मुलाचा वाढदिवस होता. मात्र करोना विषाणूमुळे त्याचे मित्र त्याला शुभेच्छा देण्यासाठी घरी आले नाही. अखेर नाराज मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी वडिलांनी चक्क पोलिसांना फोन केला. आश्चर्चचकित करणारी बाब म्हणजे पोलिसांनी देखील त्यांच्या विनंतीचा आदर राखत या मुलाला थेट घरी जाऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

रितेशने पोस्ट केलेला हा हृदयस्पर्शी व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. लॉकडाउनच्या काळात जगभरातील पोलीस सध्या आपला जीव मुठीत धरुन जनतेसाठी दिवस-रात्र काम करत आहेत. मात्र तरही अनेक लोक त्यांच्यावर टीका करत आहेत. मात्र अशा लोकांना पोलिसांचे काम लक्षात यावे म्हणून हा व्हिडीओ रितेशने पोस्ट केल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 17, 2020 3:17 pm

Web Title: riteish deshmukh share funny video of police mppg 94
Next Stories
1 मराठी गाण्यावर खळखळून हसवणारा शिल्पाचा टिक-टॉक व्हिडीओ पाहिलात का?
2 Video : महागुरुंच्या सुरेल गाण्याला नेटकऱ्यांची दाद
3 “आम्ही कार्टूनपेक्षा कमी नाही”; बिग बींचे इमोजी अवतार व्हायरल
Just Now!
X