15 July 2020

News Flash

‘तुमची नेहमी आठवण येते’; विलासरावांच्या जयंतीनिमित्त रितेश भावूक, पाहा व्हिडिओ

वडिलांच्या जयंतीनिमित्त अभिनेता रितेश देशमुख भावूक झाला आहे.

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांची आज (२६ मे) ७५ वी जयंती आहे. वडिलांच्या जयंतीनिमित्त अभिनेता रितेश देशमुख भावनिक झाला आहे. रितेशने एक भावनिक व्हिडिओ शेअर केला आहे. विलासरावांच्या पोषाखाला बिलगून रितेश त्यांचं अस्तित्व जाणवून घेताना दिसत आहे. रितेश देशमुख यावेळी भावनिक झाला असून डोळ्यावर अश्रू तरळताना दिसून येत आहेत.

“अभी मुझमे कही बाकी है थोडीसी जिंदगी” या गाण्याच्या पार्श्वभूमीवर रितेशने हा व्हिडिओ तयार केला असून आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावर शेअर केला आहे. व्हिडिओ संपताना अखेरीस विलासरावांचा फोटोही दिसतोय. शिवाय रितेश आणि विलासरावांचा एक पाठमोरा फोटोसह व्हिडिओ संपतोय. रितेशने हा व्हिडीओ शेअर करताना तुमची नेहमी आठवण येते, असं लिहिलं आहे.

सोशल मीडियाच्या माध्यमातून रितेश देशमुख नेहमीच वडिलांच्या आठवणींना उजाळा देत असतो. यावेळी रितेशने शेअर केलेला व्हिडिओ अनेकांचे डोळे पाणावणारा आहे. सरपंच ते केंद्रीय मंत्री असा प्रदीर्घ राजकीय प्रवास असलेल्या विलासराव देशमुख यांना राज्यभरातील समर्थकांनी आदरांजली अर्पण केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 26, 2020 4:19 pm

Web Title: riteish deshmukh shares an emotional video on father ex cm vilasrao deshmukh 75th birth anniversary nck 90
Next Stories
1 राम गोपाल वर्मा ‘फॅमिली डिस्टन्सिंग’वर करतायेत चित्रपट; लॉकडाउनमध्येच शूटिंग सुरु
2 Photos: प्रार्थना बेहेरेच्या कॅनव्हास पेंटिंगने जिंकली नेटकऱ्यांची मनं
3 विराटने अनुष्काला घटस्फोट द्यावा, भाजपा आमदाराची ‘त्या’ वादावरुन मागणी
Just Now!
X