News Flash

Happy Birthday Dada : रितेशने शेअर केला मिथुन चक्रवर्ती आणि विलासराव देशमुखांचा जुना फोटो

मिथुन चक्रवर्तींचं ६८ व्या वर्षात पदार्पण

हिंदी चित्रपटसृष्टीचे दिग्गज अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांनी मंगळवारी वयाच्या ६८ व्या वर्षात पदार्पण केलं. आपल्या अनोख्या शैलीने रसिकांच्या मनावर राज्य करणाऱ्या मिथुन चक्रवर्ती यांचे आजही अनेक चाहते आहेत. अनेक सेलिब्रेटींनी आजच्या दिवशी मिथुन चक्रवर्ती यांना शुभेच्छा दिल्या. बॉलिवूडचा मराठमोळा अभिनेता रितेश देशमुखनेही आजच्या दिवशी मिथुन चक्रवर्तींना अनोख्या शुभेच्छा दिल्या आहेत.

रितेशने मिथुन चक्रवर्ती आणि विलासराव देशमुख यांचा जुना फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. विलासराव आणि मिथुनदा जुने मित्र होते, लहानपणापासून तुम्ही माझे आवडते अभिनेते आहात, कोई शक…अशी कॅप्शन देत रितेशने मिथुन चक्रवर्तींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

हिंदी चित्रपटसृष्टीतला एक काळ मिथुन चक्रवर्तींनी आपल्या खास शैलीने गाजवला. डिस्को डान्सर, सुरक्षा, साहस, वारदात, बॉक्सर, प्यार झुकता नही, अविनाश, डान्स-डान्स, मुजरीम, अग्नीपथ, युगंधर अशा एकापेक्षा एक प्रसिद्ध सिनेमांमध्ये मिथुन चक्रवर्तींनी काम केलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 16, 2020 9:13 pm

Web Title: riteish deshmukh shares rare pic of mithun chakraborty with dad vilasrao deshmukh happy birthday dada psd 91
Next Stories
1 स्वराचा करण जोहर आणि आलिया भट्टला पाठिंबा, म्हणाली…
2 “मला असं खूप वाटतं की तुझ्या त्या शेवटच्या क्षणी…”; क्रिती झाली भावूक
3 पुन्हा मालिकांचे चित्रीकरण सुरु होण्यावर देवदत्त नागे म्हणतो…