06 March 2021

News Flash

अनोळखी दिव्यांग व्यक्तीच्या मदतीसाठी धावलेल्या महिलेचा व्हिडीओ पाहून रितेश म्हणाला…

हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. तो बिनधास्तपणे सामाजिक विषयांवर त्याचे मत मांडताना दिसतो. तसेच तो फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांशी संवाद देखील साधत असतो. नुकताच रितेशने एका महिलेचा व्हिडीओ शेअर केला आहे. ही महिला एका दिव्यांग व्यक्तीला मदत करताना दिसत आहे.

रितेशने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये महिला एका अनोळखी दिव्यांग व्यक्तीला बसमध्ये चढण्यासाठी मदत करताना दिसत आहे. रितेशने शेअर केलेला व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. अनेकांनी त्याच्यावर कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव केला आहे.

हा व्हिडीओ शेअर करत रितेशने कोणीही पाहत नसताना देखील या महिलाने त्या दिव्यांग व्यक्तीला मदत केली आहे. आपण या महिलेसारखे बनायला हवे या आशयाचे कॅप्शन दिले आहे. व्हिडीओमध्ये दिव्यांग व्यक्तीची मदत करण्यासाठी ती महिला बसच्या मागे पळताना दिसते. बस थांबल्यानंतर ती दिव्यांग व्यक्तीला बसमध्ये चढण्यास मदत करते. या महिलेचा व्हिडीओ शेअर करत रितेशने तिला सलाम केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 9, 2020 1:08 pm

Web Title: riteish deshmukh shares viral video of woman who trying to help handicapped man avb 95
Next Stories
1 “देशात व्यक्त होण्याचं स्वातंत्र्य नाही”; स्टॅण्डअप कॉमेडिअन कायदेशीर कारवाईमुळे वैतागला
2 “एका टेकमध्ये डान्सचं शूट पूर्ण करेन, पण…”; सुशांतची ‘ती’ शेवटची अट
3 ‘दिल बेचारा’च्या पॅकअपचा दिवस; सुशांतचा व्हिडीओ आला समोर
Just Now!
X