News Flash

रितेश म्हणाला लव्ह यू; विद्या बालननं दिला भन्नाट रिप्लाय

खुद्द रितेशने या गोष्टीचा खुलासा केला आहे

सध्या बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख त्याचा आगामी चित्रपट ‘हाऊसफूल ४’च्या प्रमोशमध्ये व्यग्र आहे. या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी ‘हाऊसफूल ४’ची संपूर्ण टीम ‘द कपिल शर्मा शो’मध्ये पोहोचली होती. कपिल शर्मा सूत्रसंचालन करत असलेल्या या शोचे चित्रीकरण नेहमी रात्री करण्यात येते. मात्र अक्षय कुमारमुळे या शोचे चित्रीकरण सकाळी ठेवण्यात आले असल्याचे म्हटले जात आहे. शोसाठी सर्व कलाकारांना सकाळी लवकर उठावे लागले असल्याचे त्यांनी शेअर केलेल्या फोटोंवरुन स्पष्ट झाले आहे.

बॉलिवूडमध्ये अक्षय कुमार खास करुन त्याच्या हटके प्रँकमुळे लोकप्रिय आहे. कोणत्याही चित्रपटाचे चित्रीकरण असो वा एखाद्या शोचे चित्रीकरण असो अक्षय काही तरी प्रँक करतच असतो. ‘कपिल शर्मा शो’मध्ये सर्व कलाकारांनी अक्षय कुमारसोबत काम करण्याचा अनुभव सांगितला. पण सर्वांचे लक्ष वेधून घेतले ते रितेशने सांगितलेल्या अनुभवाने.

आणखी वाचा : या गोष्टीमुळे मुलीने दिला होता अक्षय कुमारला नकार

‘मी आणि अक्षयने बेबी या चित्रपटात यापूर्वी एकत्र काम केले आहे. त्यावेळी शुटींग दरम्यान अक्षयने माझ्या न कळत माझा फोन घेतला आणि विद्या बालनला I Love u असा मेसेज केला. मला याबद्दल काही माहिती नव्हते. काही वेळानंतर मला विद्याचा मेसे आला. त्यामध्ये किसिंग स्माईली होत्या. ते पाहून मी हैराण झालो आणि मला कळेलेच ना की विद्याने असा मेसेज का केला. थोड्या वेळाने मी पाहिलं तर विद्याचा फोन अक्षयच्या हातात होता’ असे रितेश म्हणाला. ते ऐकून सर्वजण हसू लागले.

‘हाऊसफुल’ या फ्रँचाइजीमधला ‘हाऊसफुल ४’ हा चौथा चित्रपट आहे. अक्षय कुमारसोबतच रितेश देशमुख, क्रिती सनॉन, बॉबी देओल, पूजा हेगडे आणि क्रिती खरबंदा अशी कलाकारांची फौज यामध्ये पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन फरहाद सामजीने केले आहे. दिग्दर्शक साजिद खानवर #MeToo मोहिमेअंतर्गत लैंगिक शोषणाचे आरोप झाल्यानंतर फरहादकडे दिग्दर्शन सोपवले गेले. दिवाळीच्या मुहूर्तावर, २६ ऑक्टोबर रोजी हा कॉमेडी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 22, 2019 11:13 am

Web Title: riteish deshmukh texted i love to actress avb 95
Next Stories
1 ‘मी तुमची तक्रार करेन’, मतदानानंतर निवडणूक अधिकाऱ्यावर भडकल्या जया बच्चन
2 या फोटोमध्ये नीना गुप्ता यांना ओळखलंत का?
3 Photo : शेवंताच्या लहानपणीचे क्यूट फोटो पाहिलेत का ?
Just Now!
X