News Flash

जेनेलियासोबत वेळ घालवत असलेल्या रितेशला जेव्हा कळाले की…

रितेशने सोशल मीडियावर हा व्हिडीओ शेअर केला आहे.

रितेशने सोशल मीडियावर हा व्हिडीओ शेअर केला आहे.(Photo Credit : Riteish Deshmukh Instagram)

अभिनेता रितेश देशमुख आणि पत्नी जेनेलिया देखमुखची जोडी ही बॉलिवूडमधील लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. या दोघांचे लाखो चाहते आहेत. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत हे चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतात. हे दोघे नेहमीच सोशल मीडियावर कॉमेडि व्हिडीओ शेअर करताना दिसतात. आता देखील त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

आणखी वाचा : Video : असा साजरा केला शिल्पा शेट्टीने आपला ४६ वा वाढदिवस

हा व्हिडीओ रितेशने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओत रितेश आणि जेनेलिया असल्याचे दिसतं आहे. तर व्हिडीओच्या बॅकग्राऊंडला ‘पुट यॉर हॅन्ड्स ऑन माय शोल्डर’ हे गाणं सुरु आहे. जेनेलिया उठल्यानंतर रितेशच्या लक्षात येतं की जेनेलिया तर इथे नाही मग हा हात कोणाचा तर तो हात दिग्दर्शक मिलाप झवेरीचा असतो. मिलाप त्या दोघांच्या मागे लपलेला  होता. त्यांचा हा विनोदी व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Riteish Deshmukh (@riteishd)

आणखी वाचा : आलियाने शेअर केलं बेडरूम सिक्रेट; सेक्स पोजीशनबद्दल केलं भाष्य

रितेश आणि जेनेलिया यांची पहिली भेट ‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटाच्या सेटवर झाली होती. बरेच वर्ष रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर त्यांनी ३ फेब्रुवारी २०१२ मध्ये लग्न केलं. त्यांना दोन मुलं आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 10, 2021 6:55 pm

Web Title: riteish deshmukh thinks he is kissing genelia d souza s hand during romantic moment gets unexpected shock dcp 98
Next Stories
1 अभिनेत्री होण्यापूर्वी परिणिती चोप्रा अनुष्का शर्मासाठी करायची हे काम
2 ‘रात्रीस खेळ चाले’मधील दत्ताला पत्नीने दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, म्हणाली…
3 The Family Man 2 : काय… अरविंदच आहे खरा व्हिलन?; ‘सुची’च्या वागण्याबद्दल शरद केळकरचा मोठा खुलासा
Just Now!
X