News Flash

‘शेरास सव्वाशेर’! रितेशच्या ‘त्या’ ट्विटवर जेनेलियाचं सडेतोड उत्तर

रितेश-जेनेलियाच्या ट्विटर-वॉरने वेधलं चाहत्यांचं लक्ष

जेनेलिया, रितेश

अभिनेता रितेश देशमुख व जेनेलिया डिसूझा देशमुख यांच्यातील गोड भांडण आता ट्विटरवर आलं आहे. रितेशने जेनेलियासाठी एक मीम ट्विट केल्यानंतर त्यावर ती काय उत्तर देणार याकडे चाहत्यांचं लक्ष लागून राहिलं होतं. ”प्रत्येक चिडलेल्या महिलेमागे एक पुरुष असतो, ज्याला त्याच्याकडून नेमकी काय चूक झाली याचीच कल्पना नसते”, असा मीम रितेशने शेअर केला होता आणि त्यात जेनेलियाला टॅग केलं होतं. त्यावर जेनेलियानेही सडेतोड उत्तर दिलं आहे.

‘माझा नवरा काय बोलतोय याकडे मी सर्वसामान्यपणे लक्ष देत नाही. पण जेव्हा देते तेव्हा तो चुकीचाच असतो,’ अशी ओळ लिहिलेला मीम जेनेलियाने शेअर करत त्यात रितेशला टॅग केलं आहे. या उत्तराने जेनेलियाने ‘शेरास सव्वाशेर’ असल्याचं सिद्ध केलं आहे असं म्हणायला हरकत नाही.

बॉलिवूडमधील आदर्श जोडपं म्हणून रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसुझा यांच्याकडे पाहिलं जातं. त्यामुळे त्यांच्यातील हे ‘मीम-वॉर’ पाहून चाहतेसुद्धा कोड्यात पडले आहेत. संसार म्हटलं की भांड्याला भांडं लागणारंच, नवरा बायकोत कधी ना कधी खटके उडणारच. मग याला सेलिब्रिटीसुद्धा अपवाद नसतात, याचीच प्रचिती रितेश-जेनेलियाकडे पाहून येत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 24, 2019 10:12 am

Web Title: riteish deshmukh wife genelia dsouza indulge in a war of memes she says he is usually wrong ssv 92
Next Stories
1 ‘द कपिल शर्मा शो’ फेम अभिनेत्रीच्या बिकिनी लूकची सोशल मीडियावर चर्चा
2 ‘…तर माझ्यावर खुशाल बहिष्कार टाका’, भडकला सलमान
3 Emmy Awards 2019 : अ‍ॅमेझॉनच्या फ्लीबॅग मालिकेला चार एमी पुरस्कार
Just Now!
X