रवी जाधव दिग्दर्शित ‘बॅण्जो’ चित्रपटातील रितेश देशमुखचा फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटात तो एका बॅण्जो पथकातील तरूणाची भूमिका साकारत आहे. वादकाच्या भूमिकेत असलेला रितेश लांब केस आणि हलकीशी वाढलेली दाढी या लूकमध्ये दिसेल. याआधी रितेश कधीही अशा लूकमध्ये दिसलेला नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा चित्रपट एक कथा नसून तो एक प्रवास आहे. एका अशा व्यक्तीचा प्रवास जो आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी सातासमुद्रापार प्रवास करतो. एका अमेरिकेतील डीजे प्लेयरची ओळख मुंबईतील बॅण्जो पार्टीशी होते आणि त्यांचा प्रवास सुरु होतो. हे दोघे एकत्र काही क्षण घालवतात. जीवनातील उतारचढावांना हे दोघे एकत्र सामोरे जातात. ‘बॅण्जो’ चित्रपटाची निर्मिती क्रिशिका लुल्ला करत असून रितेश आणि नर्गिस पहिल्यांदा एकत्र काम करताना दिसतील.

Gukesh vs Ian Nepo ends in a draw
कॅन्डिडेट्स बुद्धिबळ स्पर्धा : गुकेश-नेपोम्नियाशी लढत बरोबरीत, संयुक्त आघाडी कायम; विदितने प्रज्ञानंदला रोखले; कारुआना, नाकामुरा विजयी
spmcil recruitment 2024 jobs in security printing and minting corporation of India ltd
नोकरीची तयारी : सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेसमधील संधी
baltimore
US Bridge Collapse: धोक्याची सूचना देणाऱ्या भारतीय खलाशांचे जो बायडेन यांनी मानले आभार
hardik pandya
मुंबई इंडियन्सच्या ‘हार्दिक’पर्वाला सुरुवात! सलामीच्या लढतीत आज गुजरात टायटन्सशी गाठ