01 October 2020

News Flash

‘लई भारी’ मराठी चित्रपटात रितेश देशमुख

आपल्या अभिनयाद्वारे हिंदी चित्रपटसृष्टीत स्थान निर्माण केल्यावर आता रितेश देशमुख मराठी चित्रपटात अभिनय करताना दिसणार आहे. याआधी रितेशने 'बालक पालक' या मराठी चित्रपटाची निर्मिती

| July 9, 2013 11:54 am

आपल्या अभिनयाद्वारे हिंदी चित्रपटसृष्टीत स्थान निर्माण केल्यावर आता रितेश देशमुख मराठी चित्रपटात अभिनय करताना दिसणार आहे.  याआधी रितेशने ‘बालक पालक’ या मराठी चित्रपटाची निर्मिती केली होती. आता एक अभिनेता म्हणून तो ‘लई भारी’ या मराठी चित्रपटात दिसणार असून, तो या चित्रपटाचा सहनिर्मातादेखील आहे. या मनोरंजनपर अॅक्शनपटात रितेश मुख्य भूमिकेत आहे. रितेशने अभिनेता, सूत्रसंचालक, रियालिटी शोमधील जज आणि चित्रपट निर्माता अशा अनेक भूमिका बजावल्या असून, या हरहुन्नरी अभिनेत्याच्या मराठी चित्रटातील अभिनयाची मराठी प्रेक्षक वाट बघत आहेत. ‘लई भारी’ चित्रपटाद्वारे त्यांची ही इच्छा पूर्ण होणार आहे.
सिनेमंत्रा आणि मुंबई फिल्म कंपनी या संस्थाची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन निशिकांत कामत यांचे आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 9, 2013 11:54 am

Web Title: riteish deshmukhs debut marathi film lai bhari goes on floors
Next Stories
1 अश्लिलता पसरविल्या प्रकरणी मल्लिकावर वॉरंट
2 रिमेकवरही अमिताभचे अधिराज्य!
3 गुरुदत्तची आत्महत्या वहिदा रेहमानमुळे नव्हे – कल्पना लाजमी
Just Now!
X