News Flash

‘दुनियादारी’ला रितेशच्या ‘लय भारी’ची किक!

रितेश देशमुखची निर्मिती आणि अभिनय असलेल्या 'लय भारी'ची तिकीट बारीवर जोरदार कमाई चालू आहे.

| July 27, 2014 04:53 am

रितेश देशमुखची निर्मिती आणि अभिनय असलेल्या ‘लय भारी’ची तिकीट बारीवर जोरदार कमाई चालू आहे. ११ जुलैला प्रदर्शित झालेल्या ‘लय भारी’ने आत्तापर्यंत २७ कोटींचा गल्ला जमावला असून, ‘दुनियादारी’चा रेकॉर्ड मोडला आहे. त्यामुळे ‘लय भारी’ने दुनियादारीला चांगलीच किक दिली आहे असे म्हणायला हवे. आता या चित्रपटाचे लक्ष्य आहे ते म्हणजे रवी जाधवचा ‘टाइमपास’ चित्रपट. ‘टाइमपास’ने ३७ कोटींच्या कमाईचा रेकॉर्ड केलेला आहे. रितेशचा ‘लय भारी’ हा रेकॉर्ड मोडतो की नाही हे पाहणे औत्सुक्याचे राहील.
‘टाईमपास’ आणि ‘दुनियादारी’ या चित्रपटांचे विक्रम मोडीत काढत पहिल्याच दिवशी या चित्रपटाने ३.१० कोटींची कमाई करत नवा विक्रम केला होता. सिनेमंत्र, मुंबई फिल्म कंपनी निर्मित आणि एस्सेल व्हिजनची प्रस्तुती असलेला ‘लय भारी’ हा चित्रपट पहिल्यांदाच महाराष्ट्रासह गोवा, कर्नाटक, गुजरात, मध्यप्रदेश या राज्यांमधून दाखवण्यात आला. मराठीत पहिल्यांदाच या चित्रपटाचे दिवसाला १५०० शो दाखवण्यात येणार होते. मात्र, प्रत्यक्षात बऱ्याच ठिकाणी प्रेक्षकांच्या मागणीमुळे शोची संख्या वाढवावी लागली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 27, 2014 4:53 am

Web Title: riteish deshmukhs lai bhari earned 27 crores on box office
Next Stories
1 गुरु दत्त यांच्या मुलाचे निधन
2 चुंबनदृश्य देताना मी नव्‍‌र्हस असतो!
3 गूढ, रहस्यमय पण..
Just Now!
X