News Flash

‘मोदींनी राज्यसभेत केलेल्या भाषणाने मी…’, रितेशचे ट्विट चर्चेत

त्याचे हे ट्विट सध्या चर्चेत आहे.

देशाने राज्यसभेत काल वेगळंच दृश्य बघितलं. विविध मुद्द्यांवरून जिथे सभापतींच्या हौद्यापर्यंत पोहोचून गोंधळ घातला जात असल्याचं चित्र असतं, तिथे भावनिक वातावरण होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणानंतर सभागृह स्तब्ध झाल्याचं पाहायला मिळालं. पंतप्रधानांच्या भाषणातून गुलाम नबी आझाद यांच्यातील हळवा माणूस सभागृहाने पाहिला. पंतप्रधान मोदींनाही अश्रू अनावर झाले. मोदींच्या या भाषणानंतर त्या दुःखद प्रसंगाबद्दलची चर्चा होताना दिसत आहे. दरम्यान अभिनेता रितेश देशमुखने केलेले ट्विट चर्चेत आहे.

रितेश देशमुखने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भावुक होण्यावर ट्विट केले आहे. ‘गुलाम नबी आझाद साहेब राज्यसभेतून निवृत्त होताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या भाषणाने मी प्रभावित झालो आहे’ या आशयाचे ट्विट रितेशने केले आहे.

काय होती ती घटना?

जुलै २००७ मध्ये गुजरातमधून काही पर्यटक काश्मिरमध्ये पर्यटनासाठी गेले होते. श्रीनगर जवळ असताना यात्रेकरूंच्या बसवर दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला. यात्रेकरूंची बस मुघल गार्डनच्या दिशेनं जात असताना हा हल्ला झाला होता. यात जवळपास ८ जण जागीच मरण पावले होते. तर काही जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. हा हल्ला झाला त्यावेळी गुलाम नबी आझाद जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री होते. या घटनेनंतरचा एक ह्रदयद्रावक व्हिडीओ असून, त्यात जखमींना मदतीसाठी धावणारे आणि त्यांचं सात्वंन करताना आझाद दिसत आहे. जखमींचे मृतदेह आणि नातेवाईकांना हवाई दलाच्या विमानात टाकल्यानंतर आझादांनी माफी मागितली. “फुलं-फळं देऊन परत पाठवणार होतो, पण… मुलांचे मृतदेह…. आम्हाला माफ करा”, असं म्हणत आझादांनी जोडले हात जोडले. हे म्हणत असताना त्यांचा कंठही भरून आला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 10, 2021 3:42 pm

Web Title: ritiesh deshmukh reaction on pm narendra modi gets emotional on ghulam nabi azad farewell avb 95
Next Stories
1 ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीला ओळखलं का? बॉलिवूडमध्येही आहे दबदबा
2 धनश्री वर्मा आणि श्रेयस अय्यरचा डान्स व्हिडीओ व्हायरल
3 ‘अ मॅरिड वूमन’चा टीझर प्रदर्शित; पाहा व्हिडीओ
Just Now!
X