News Flash

अभिनेत्री रिया सेनने वेटरला म्हटले, ‘कॅन आय हॅव सम सेक्स प्लीज’

'सेक्स' हा शब्द जरी ऐकू आला तरी अनेकांच्या भुवया उंचावतात.

रिया सेन

बॉलीवूडमध्ये सध्या अभिनेत्री रिया सेन ही सक्रिय नसल्याचेच दिसते. ‘स्टायल’, ‘शादी नं. १’, ‘सिलसिले’ आणि यांसारख्या काही हिंदी चित्रपटांमध्ये काम केलेली ही अभिनेत्री सध्या बॉलीवूडमध्ये सक्रिय नसली तरी बंगाली चित्रपटांमध्ये ती बरीच व्यस्त आहे. शीना बोरा हत्या प्रकरणावर आधारित ‘डार्क चॉकलेट’ या चित्रपटातील तिच्या भूमिकेने सर्वांचे लक्ष वेधलेले. यात अभिनेत्री महिमा चौधरी हिनेही भूमिका साकारली होती. मून मून सेन यांची मुलगी असलेली रिया ही तिच्या बोल्डनेससाठी देखील बरीच प्रसिद्ध आहे. पण, सध्या रिया चर्चेत येण्याचे कारण काही वेगळेच आहे. ‘सेक्स’ हा शब्द जरी ऐकू आला तरी अनेकांच्या भुवया उंचावतात. असाच काहीसा प्रसंग रियासोबत नुकताच घडला.

अंधेरी येथील एका प्रसिद्ध रेस्तराँमध्ये रिया गेली होती. या रेस्तराँमध्ये ‘सेक्स ऑन द बीच’ हे कॉकटेल आणि ‘एग्ज ऑन द बीच’ नावाचा पदार्थ मिळतो. स्पॉटबॉय या संकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार, वेटर रियाच्या टेबलवर ऑर्डर घेण्यासाठी गेला असता, तिने पटकन ‘कुड आय हॅव सम सेक्स प्लीज’ असे म्हटले. पण, क्षणार्धातच रियाला तिची चूक उमगली. लगेचच तिने ऑर्डर बदलत म्हटले की, ‘कुड आय हॅव सम एग्ज प्लीज’. या गोंधळानंतर वेटर शांत होता. पण, रियाला तिची चूक लक्षात आल्याने ती जोरात हसू लागली.

एकदा मुलाखती दरम्यान रियाने बॉलीवूडमधून तिला समलैंगिक व्यक्तिरेखा साकारण्याच्या ऑफर्स आल्याचे सांगितले होते. पण, अशा भूमिकांमध्ये काहीच अर्थ नसल्याचे रियाला वाटले आणि त्यामुळे तिने त्या भूमिका स्विकारल्या नाहीत. रिया ही नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन डिझायनिंग आणि आयटीची विद्यार्थिनी राहिली आहे. फाल्गुनी पाठकच्या याद पिया की आने लगी या म्युझिक व्हिडिओने रिया प्रसिद्धीस आली होती. काही मॉडेलिंग ऑफर्सनंतर रिया लॅक्मे, निरमा लाइम फ्रेश सोप, किओ कार्पिन बॉडी ऑइल, क्लोज अप टूथपेस्ट, लिमका, कोलगेट, रिलायन्स आणि अन्य काही प्रॉडक्सच्या जाहिरातींमध्ये झळकली होती. तसेच, तिने भारत, दुबई, बाहरेन, मलेशिया यांसारख्या काही फॅशन विक्सची ती शोस्टॉपरही राहिली आहे. २००१ साली स्टायल या चित्रपटाने तिने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. बॉलीवूड व्यतिरीक्त रियाने बंगाली, तमिळ, तेलगू, मल्याळम आणि इंग्रजी भाषिक चित्रपटांमध्येही काम केले आहे. रियाने लोनली गर्ल या लघुपटातही काम केले होते. या लघुपटाची कथा ही एक महिला आणि तिची समलैंगिक प्रेयसी यांच्यावर आधारित आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 4, 2017 11:56 am

Web Title: riya sen asked a waiter could i have some sex please
Next Stories
1 VIDEO: नीतू सिंग यांच्या ‘फिटनेस’चे रहस्य
2 ‘खून भरी मांग’ फेम अभिनेत्री सोनू वालिया यांना अश्लील फोन कॉल; पोलिसांकडे तक्रार दाखल
3 ‘दक्षिणायन’तर्फे अजेय चित्रपट मालिका
Just Now!
X