23 November 2017

News Flash

रिया सेनचा ‘रागिनी एमएमएस २’ मधील सीन लीक

रागिणी आणि सिमरन या दोन मुलींच्या आयुष्याभोवती वेबसीरिजची कथा घडते

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: September 14, 2017 6:40 PM

रिया सेन

अभिनेत्री रिया सेनने लग्न केल्यापासून ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. रियाने अचानक केलेल्या लग्नामुळे अनेकांच्याच भुवया उंचावल्या गेल्या होत्या. ती गरोदर असल्यामुळे तिने लवकर लग्न केले अशा चर्चाही काही दिवसांपूर्वी सिनेवर्तुळात होत होत्या. या सगळ्या गोष्टी शांत होतात न होतात आता पुन्हा एका बातमीने रियाचे नाव सर्वांच्या तोंडी येऊ लागले आहे. रिया सेनचा एक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. या व्हिडिओतील एक बोल्ड सीन लीक झाला आहे. त्यामुळे रिया पुन्हा चर्चेत आली आहे.

‘या’ वादग्रस्त विधानामुळे प्रियांकाला मागावी लागली माफी

एकता कपूरच्या ‘रागिनी एमएमएस २.२’ या वेबसीरिजमध्ये रिया काम करत आहे. नुकतेच या वेबसीरिजचा ट्रेलर प्रदर्शित झाला. ट्रेलर पाहून ही वेबसीरिज फार बोल्ड असणार यात काही शंका नाही. पण प्रदर्शनापूर्वी या वेबसीरिजचे काही बोल्ड सीन लीक झाले आहेत.

#freedom with a #capital F 🙌🏻

A post shared by Riya Sen (@riyasendv) on

या व्हिडिओत अभिनेत्री रिया सेन तिचा सहकलाकार निशांत मलकानीसोबत प्रणयदृश्य देताना दिसते. अगदी थोड्याच वेळात हा व्हिडिओ सोशल मीडियावर कमालीचा व्हायरल झाला आहे. असे म्हटले जाते की या वेबसीरिजमध्ये एवढे बोल्ड सीन द्यायला सुरुवातीला रिया तयार नव्हती. तिने याबाबत दिग्दर्शक सुयश वाढवकरशीही चर्चा केली. मात्र सुयशने दृश्यात कोणतेही बदल करण्यास नकार दिला.

🦍 #itsbeginningtolookalotlikechristmas 🔪

A post shared by Riya Sen (@riyasendv) on

पहिल्या दोन सिनेमांपेक्षा ही वेबसीरिज अधिक बोल्ड आणि भयावह असल्याचे म्हटले जात आहे. करिश्मा शर्मा यात रागिणीची भूमिका साकारत असून सिमरनच्या व्यक्तिरेखेत रिया सेन असणार आहे. रागिणी आणि सिमरन या दोन मुलींच्या आयुष्याभोवती वेबसीरिजची कथा घडते.

First Published on September 14, 2017 6:40 pm

Web Title: riya sens leaked sex scene from web series ragini mms returns goes viral