News Flash

MTV Roadies फेम रघू रामच्या आयुष्यात परतलं प्रेम

'तिच्या'सोबतचा फोटो पोस्ट करत दिली कबुली

रघू राम

‘रोडिज’ या प्रसिद्ध रिअॅलिटी शोचा निर्माता आणि परीक्षकपदी असणारा रघू राम पुन्हा एकदा प्रकाशझोतात आला आहे. यावेळी तो कोणा स्पर्धकाशी उद्धट वक्तव्य केल्यामुळे किंवा सुगंधा गर्गसोबतच्या त्याच्या नात्यामुळे चर्चेत आलेला नाही. टेलिव्हिजन विश्वात आपली अनोखीच छाप सोडणाऱ्या रघुच्या आयुष्यात आता प्रेम परतलं आहे. खरंतर वर्षभरापूर्वीच ‘ती’ त्याच्या आयुष्यात आली आहे. आता तुम्ही म्हणाल ही ‘ती’ कोण, खुद्द रघुनेच त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन तिच्यासोबतचा फोटो पोस्ट केला आहे. कॅनेडियन गायिका नताली दी ल्यूसिओ असं तिचं नाव असून साधारण एक वर्षापासून हे दोघंही एकत्र आहेत.

रघुने नतालीसोबतचा फोटो पोस्ट करण्याचं कारण त्यांच्या नात्याची वर्षपूर्ती. प्रेमाच्या या प्रवासाला एक वर्ष पूर्ण झाल्यामुळे रघुने अनोख्या अंदाजात त्याच्या खासगी आयुष्याविषयीचा हा महत्त्वाचा खुलासा केला आहे. ‘नताली तूच मला एकदा सांगितलं होतंस की आयुष्यात जादूही होते. आजच्याच दिवशी वर्षभरापूर्वी तू माझ्या आयुष्यात आलीस आणि अशक्य असलेल्या गोष्टीही शक्य झाल्या. तुझ्या येण्याने मी पुरता बदलून गेलो. प्रेम, आशेचा किरण आणि आनंद या साऱ्य़ाची मला अनुभूती झाली. खरंतर मला या सर्व भावनांची पुन्हा एकदा तुझ्या आणि तुझ्याचमुळे अनूभूती झाली. हे एक वर्ष खूपच आनंददायी होतं. तुला या खास दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा’, असं कॅप्शन लिहित रघुने नतालीसोबतचा सुरेख फोटो पोस्ट केला. त्याचा हा अंदाज सर्वांचीच मनं जिंकून गेला.

वाचा : फ्लॅशबॅक : माधुरीचे ‘एक दो तीन…’ कायम १ नंबर

रघुच्या खासगी आयुष्याविषयी सांगायचं तर जानेवारी २०१८ मध्ये त्याने आणि अभिनेत्री सुगंधा गर्गने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला होता. दोघांनीही परस्पर सामंजस्याने हा निर्णय घेतला होता. अद्यापही त्यांच्या घटस्फोटाची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झालेली नसली तरीही आपआपल्या आयुष्यात या दोघांनीही वेगळ्या वाटा निवडल्या असून, त्यातही मैत्रीचं नातं कायम ठेवलं आहे.

‘सध्या सुगंधा मद्रिदमध्ये शिकत असून ती भारतात परतल्यानंतर आम्ही घटस्फोटाची प्रक्रिया पूर्ण करु. सध्यातरी याविषयी सांगण्यासारखं काहीच नाही आणि काही असेलच तर मी त्याबद्दल नक्कीच माहिती देईन. मुळात आम्ही घटस्फोटाची पार्टीही देऊ’, असं रघू काही दिवसांपूर्वीच ‘हिंदुस्तान टाईम्स’ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 28, 2018 12:15 pm

Web Title: roadies indian television producer raghu ram declares his love for canadian singer natalie di luccio on instagram see photo
Next Stories
1 खोटे निघाले या अभिनेत्रीच्या निधनाचे वृत्त
2 कपिलला अजूनही सलतंय सुनील नसल्याचं दु:ख
3 ‘मुस्लिमांनी कृष्णाची भूमिका साकारणं गैर’, आमिरच्या चित्रपटावरून ‘महाभारत’
Just Now!
X