News Flash

रॉबर्ट डी नीरोंची ट्रम्प यांच्यावर शिव्यांची बरसात

अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे नेहमीच आपले चित्रविचित्र निर्णय व वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असतात.

अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे नेहमीच आपले चित्रविचित्र निर्णय व वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असतात. राष्ट्राध्यक्ष म्हणून त्यांच्या आजवरच्या कामगिरीवर जगभरातील अनेक मान्यवर कलाकारांनी वेळोवेळी प्रश्न उपस्थित केले आहेत. या यादीत आता रॉबर्ट डी नीरो हे आणखीन एक नवीन नाव जोडले गेले आहे. ‘टॅक्सी ड्रायव्हर’, ‘रॅगिंग बुल’, ‘द गॉडफादर २’, ‘द किंग ऑफ कॉमेडी’ यांसारख्या सुपरहिट चित्रपटांमधून १९७०-९०च्या दशकांत चाहत्यांच्या मनावर राज्य करणारे  रॉबर्ट डी नीरो अफलातून अभिनयाबरोबरच आपल्या परखड आणि ठाम मतांसाठीदेखील ओळखले जातात. त्यांनी नुकत्याच पार पडलेल्या ‘टोनी पुरस्कार’ सोहळ्यात अमेरिकन प्रशासनाचे जाहीर वाभाडे काढत डोनाल्ड ट्रम्पवर शिव्यांची बरसात केली. आणि आश्चर्याची बाब म्हणजे त्यांच्या या कृतीला प्रेक्षकांनी चक्क उभे राहून टाळ्या वाजवत दाद दिली.

‘सीबीएस’ वाहिनीवर या पुरस्कार सोहळ्याचे थेट प्रक्षेपण केले गेले. अमेरिकन संगीतकार ब्रूस स्प्रिंगस्टीन यांचे कौतुक करण्यासाठी रॉबर्ट डी नीरो यांना व्यासपीठावर बोलवण्यात आले. परंतु ब्रूसवर बोलता बोलता आचानक त्यांचा सूर डोनाल्ड ट्रम्पच्या दिशेने लागला. पुढे ते भावनेच्या भरात इतके वाहत गेले की त्यांनी व्यक्तिश: ट्रम्पवर अक्षरश: शिव्यांची बरसात केली. दरम्यान, प्रेक्षकांनीही त्यांना आणखीन उत्तेजन दिले. प्रेक्षकांची आरडाओरड व उत्स्फूर्त प्रतिसाद यामुळे उत्तेजित झालेल्या रॉबर्ट यांना थांबवणे अत्यंत कठीण झाले होते. ‘सीबीएस’ वाहिनीने पुन:प्रक्षेपणादरम्यान त्यांची वादग्रस्त विधाने काढून टाकली. तसेच त्यांच्या शिव्यांवर बीप लावले गेले. परंतु पुरस्कार सोहळ्यात उपस्थित असलेल्या प्रेक्षकांनी मात्र त्यांचे संपूर्ण भाषण रेकॉर्ड करून समाजमाध्यमांवर व्हायरल केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 1, 2018 2:06 am

Web Title: robert de niro donald trump hollywood katta part 133
टॅग : Hollywood Katta
Next Stories
1 सुशांत सांगतोय आपलीच गोष्ट!
2 यंग्राड
3 जुलैमध्ये अक्षय घेऊन येतोय ‘टॉयलेट २’
Just Now!
X