News Flash

हॉलिवूड अभिनेत्याने मुंबईकर मुलीला केलं लोकप्रिय; पाहा व्हिडीओ…

पाहा चकित करणारा व्हिडीओ...

‘स्टेप अप द स्ट्रीट’, ‘कोट कार्टर’, ‘डान्स अॅकेडमी’ यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये झळकलेला रॉबर्ट होफमन हा हॉलिवूड सिनेसृष्टीतील नामांकित अभिनेता म्हणून ओळखला जातो. डान्स आणि अनोख्या अॅक्शन स्टाईलमुळे लोकप्रिय झालेला हा अभिनेता सध्या मुंबईतील एका गरीब मुलीमुळे चर्चेत आहे. रॉबर्टने मुंबईतील झोपडपट्टीत राहणाऱ्या एका लहान मुलीचा व्हिडीओ आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला. परिणामी ही मुलगी रातोरात प्रसिद्ध झाली आहे.

 

View this post on Instagram

 

When Robert visits me I like making him speak in Hindi because it sounds so funny! #kidsmodel #model #theprincessfromtheslum

A post shared by Maleesha Kharwa (@maleeshakharwa) on

या मुलीचं नाव मलिशा खारवा असं आहे. रॉबर्ट फेब्रुवारी महिन्यात आपल्या एका म्युझिक अल्बमच्या निमित्ताने मुंबईत आला होता. त्याला आपल्या अल्बमसाठी मुंबईतील काही लोकल डान्सर्स हवे होते. याच दरम्यान त्याची मलिशासोबत मैत्री झाली. गरीब वस्तीत राहणाऱ्या या लहान मुलीचं इंग्रजी ऐकून तो फार प्रभावित झाला. त्याने मलिशासोबतचा एक व्हिडीओ आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केला. हा गंमतीशीर व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडीओमुळे मलिशा रातोरात प्रसिद्ध झाली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 3, 2020 11:26 am

Web Title: robert hoffman maleesha kharwa viral video mppg 94
Next Stories
1 प्रियांकाने लिहिलेलं पुस्तक ठरलं ‘बेस्ट सेलर’; अवघ्या १२ तासांत केला ‘हा’ विक्रम
2 मलायकामुळे नोरा फतेहीने सोडला ‘इंडियाज बेस्ट डान्सर’ शो?
3 शाहरुख खान- कटप्पाचा ‘हा’ चित्रपट माहित आहे का ?
Just Now!
X